आजचा विषय मोदक….
मोदक म्हटलं की लगेच आठवते ते तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा – साजूक तुपाच्या धारेबरोबर – शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद असलेला हे उकडीचे मोदक जे गणपती आल्यावर पहिल्या जेवणात नैवेद्ध म्हणून असतातच. प्रत्येक घरात गृहिणीनी बनवलेले मोदक, याची एक वेगळीच चव असते. काही जणी तर साचा न वापरता […]