अजिंठ्याची लेणी लोकांच्या दृष्टिपथात आणली गेल्याची 203 वर्षे
१८२२ मध्ये सर विल्यम एर्स्किन यांनी आपल्या लेखनात जॉन स्मिथ दैनंदिनी ईस्ट इंडिया कंपनीचे निर्देशनासह अजिंठा लेणी स्थापत्य, शिल्प व चित्रांची चर्चा केली आहे. इसवी सन पूर्व २०० च्या सुमाराला लेणी खोदण्यास सुरुवात झाली होती. पैठणच्या सातवाहन घराण्यातील सम्राटानी याची सुरुवात केली. सातवाहन काळात ८, ९, १०,१२, १३ आणि १५ या लेण्यांचे खोदकाम पूर्ण झाले. पुढे जवळपास ५०० वर्षे खोदकाम बंद होते त्यानंतर पुन्हा पाचव्या शतकात गुप्त , वाकाटक आणि बदामीच्या चालुक्यांनी येथील लेण्यांचे खोदकाम सुरु केले. […]