पहिल्या महिला भारुड सम्राज्ञी पद्मजा कुलकर्णी
पद्मजाताई स्वतः पेटी, तबला, ढोलकी चांगली वाजवतात. नाथांच्या भारुडांबरोबरच बदलत्या सामाजिक समस्यांना न्याय देण्यासाठी स्वतःच्या पद्यरचना त्यांनी केल्या. संगीत,संवाद, नृत्यदिग्दर्शन असा सबकुछ ‘पद्मजा’ टच मिळाल्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणि लोकप्रियता वाढत गेली. गल्लीतल्या देवळापासून सुरू केलेला भारुडाचा कार्यक्रम दिल्लीपर्यंत म्हणजे केवळ देशातच नाही, तर देशाच्याही बाहेर गाजला. इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका या देशांमध्येही भारुडाच्या कार्यक्रमाने लोकप्रियता मिळवली. […]