नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

प्रसिध्द बासरीवादक प्रा. सचिन जगताप

कोल्हापूरातील प्रसिध्द बासरीवादक व ‘जीवनगाणे’ वाद्यवृंदाचे निर्माते प्रा.सचिन जगताप हे भारतातील पहिले कलाकार आहेत की ज्यांनी बासरी वादनामध्ये गांधर्व महाविद्यालयाची “संगीत अलंकार” ही पदवी थेट प्रवेश घेऊन संपूर्ण भारतात पहिला क्रमांक मिळण्याचा बहुमान त्यांना मिळाला. याचबरोबर शिवाजी विद्यापिठामध्ये हार्मोनियममध्ये एम.ए. संगीतमध्ये ते शिवाजी विद्यापिठात पहिले आले आहेत. […]

तबला वादक पं. विभव नागेशकर

पं.विभव नागेशकरांनी श्रीमती झरीन दारुवाला शर्मा, पं. डी. के. दातार, श्री.रोहिणी भाटे, पं. बुद्धादित्य मुखर्जी, पं. शिवकुमार शर्मा, पं.जसराज, पं. भिमसेन जोशी, पं.विश्वमोहन भट, प.हरीप्रसाद चौरसिया यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ दिली आणि संगीतक्षेत्रात श्रोत्यांच्या मनात नाव कमाविले. त्यांनी प्रतिष्ठीत अशा श्रीमती गिरीजाबाई केळकर समारोह (फोंडा, गोवा), केसरबाई केरकर महोत्सव (भोपाळ), उ.अल्लादिया खान स्मृती दिन समारोह(चेंबुर), पंडीत ओंकारनाथ फेस्टिवल (जामनगर), लक्ष्मीबाई जाधव समारोह (चेंबुर) स्वरानंद (दहीसर-मुंबई), पेशकर फाऊंडेशन (मुंबई),सप्तक (नाशीक) अनेक कार्यक्रमात तबला वादन केले आहे. […]

प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी

प्रसिद्ध बासरीवादक पं. रूपक कुलकर्णी यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ रोजी झाला. तरुण पिढीमध्ये सर्वात लोकप्रिय बासरी वादक रूपक कुलकर्णी यांनी आपले वडील मल्हार कुलकर्णी यांच्या कडून सुरवातीचे शिक्षण घेतले. रूपक कुलकर्णी हे वयाच्या ९ व्या वर्षी पद्म विभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य झाले. वयाच्या ९ वर्षांच्या पासूनच, कठोर प्रशिक्षण घेत रुपक कुलकर्णी यांनी ध्रुपद, […]

ज्येष्ठ संगीतकार रामकृष्ण शिंदे म्हणजेच संगीतकार हेमंत केदार

रामकृष्ण शिंदे यानी हेमंत केदार या नावाने संगीत दिले. रामकृष्ण शिंदे यांनी १९४७ साली आलेल्या ‘मॅनेजर’ चित्रपटाने आपले करियर सुरूवात केले. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आई.पी.तिवारी व मुख्य कलाकार होते जयप्रकाश, पूर्णिमा, गोबिंद, सरला, अज़ीज़, अमीना व तिवारी. […]

ललित लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष

डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे ज्येष्ठ समीक्षक आणि ललित लेखक म्हणून ओळखले जात असत. ‘पुरुषराज अळुरपांडे’ असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकांत येत असत. गंमत म्हणजे ते नाव घेऊन लिहिणारी एक व्यक्ती नसून तीन जण होते. ते म्हणजे – पु. ल. देशपांडे, रा.वा.अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष! […]

दिग्दर्शक, निर्माते व अभिनेते जयंत देसाई

1930 मध्ये आलेला चित्रपट नूर-ए-वतन हा त्यांचे पहिले स्वतंत्र दिग्दर्शन असलेला चित्रपट होत. रणजीत फिल्म कंपनीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत असताना त्यांनी दोन बदमाश (१९३२), चार चक्रम (१९३२) आणि भूतियो महल (१९३२) या काही चित्रपटांचे दिग्दर्शन सहाय्य केले. पुढे त्यांनी तुफानी टोली (१९३७), तानसेन (१९४३), हर हर महादेव (१९५०) आणि अंबर (१९५२) यासह अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले. तानसेन चित्रपट हा १९४३ चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. […]

जिगरबाज मल्ल गणपतराव आंदळकर

गादीवरील खेळाचा पुरता अनुभव नसतानाही १९६४ साली टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्यांनी देशाचे नेतृत्व केले. पाकिस्तानच्या मल्लाशी कुस्ती म्हटली की कुस्तीशौकिनांना चेव चढतो. एक दोन नव्हे तर तब्बल ४० पाकिस्तानी मल्लांना अस्मान दाखवून त्यांनी कोल्हापूरच्या मातीची ताकद दाखवून दिली. […]

श्रेष्ठ मराठी कोशकार यशवंत रामकृष्ण दाते

कर्वे यांच्या साहाय्याने तयार केलेला सुलभ विश्वकोश (१९४९–५१) सहा भागांत प्रसिद्ध झाला. महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश (२ खंड, १९४२, १९४७) आणि शास्त्रीय परिभाषा कोश (१९४८) ही याच द्वयीने निर्माण केलेली कोशसंपदा होय. दाते यांनी रा. त्र्यं. देशमुख ह्यांच्या सहकार्याने, १८१० ते १९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी मासिकांची, त्यांतील लेखांची, तसेच मराठी ग्रंथांची आणि ग्रंथकारनामांची सूची महाराष्ट्रीय वाङ्‌मयसूची (१९१९) ह्या नावाने तयार केली. शंकर गणेश दाते ह्यांनी तयार केलेल्या प्रसिद्ध ग्रंथसूचीच्या पूर्वी तशा दिशेने झालेला एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून ही सूची महत्वाची. […]

ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर

१९९७ ला स्वतंत्रपणे दिग्दर्शन केलेल्या ‘पैज लग्नाची’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला महाराष्ट्र शासनाचे विक्रमी १४ राज्य पुरस्कार मिळाले होते. ‘घे भरारी’ या दुसऱ्या आशयघन चित्रपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. तर, ‘राजा पंढरीचा’ या भक्तीपटाला ३ राज्य पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या ‘राजमाता जिजाऊ’ हा ऐतिहासीक कशानकावर आधारित चित्रपटाला लंडनमध्येही प्रदर्शित करण्यात आलं होतं. […]

केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचे माजी सचिव अच्युत गोखले

नागालँडमध्ये त्यांनी पर्यावरण संरक्षण आणि लोक आर्थिक विकासाचा पाया रचला. वन आणि पर्यावरण मंत्रालयात केंद्रीय सचिव म्हणून काम करताना त्यांनी बीटी कॉटनला मान्यता दिली. ते भारतीय अन्न महामंडळाचे अध्यक्षही होते. ऊर्जा विभागात असताना त्यांनी ‘द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूट’ची (टेरी) स्थापना केली. निवृत्तीनंतर चेन्नईच्या एम. एस. स्वामिनाथन संशोधन केंद्रात कार्यकारी संचालक म्हणून काम करून, गुणात्मक बदल घडविला. वनस्पतींची छायाचित्रे काढणे, संगीत ऐकणे हे त्यांचे छंद होते. […]

1 62 63 64 65 66 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..