जागतिक हॅम रेडिओ दिवस
भारतातील एखाद्या व्यक्तीने देशातच आणीबाणीच्या प्रसंगी पाठवलेला संदेश वातावरणातील त्या वेळच्या स्थितीमुळे कदाचित मिळणार नाही; पण अनुकूल वातावरण असलेल्या कोणत्याही ठिकाणच्या “हॅम’वर तो जाऊन पोचतोच. अतिशय तातडीचा किंवा आणीबाणीचा प्रसंग असेल, तर ज्याला संदेश मिळाला तो अन्य मार्गाने मदत पोचवण्याचा प्रयत्न करतो. दुर्घटना किंवा आपत्कालीन परिस्थितीत संदेशवहनासाठी हॅम रेडिओ हे एक प्रभावी माध्यम आहे. […]