नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

संगीतकार सलिम मर्चंट

सलीम मर्चंट यांनी चित्रपटसृष्टीत आपल्या सुरेल गायकीने वेगळी ओळख निर्माण केली आहे.सलीम-सुलेमान जोडीपैकी एक म्हणजे सलीम मर्चंट यांनी सिनेसृष्टीत आपल्या गायकीने खूप लोकप्रिय गाणी गायली आहेत. सलिम आणि त्याचा मोठा भाऊ सुलेमान मर्चंट हे सलीम-सुलेमान या नावाने संगीतकार जोडी प्रसिद्ध आहे. […]

क्रांतिवीर देशभक्त भार्गव महादेव उर्फ बाबा फाटक

बाबा फाटक यांचा जन्म दशग्रंथी गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील भिक्षुकी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असत. वडील महादेव उर्फ बाळशास्त्री, आई गंगा व भावंडे कै. वेणू, गोपाळ,वासुदेव व विष्णू ही सगळीच मंडळी देशप्रेमी. नाशिक येथे इंग्रज अधिकारी जॅक्सन याचा खून करणारे अनंत कान्हेरे बाळशास्त्रीचें स्नेही मित्र. […]

अभिनेत्री पूर्णिमा

अभिनेत्री पूर्णिमा यांचे खरे नाव ‘मेहर बानो’ होते. पूर्णिमा यांचे वडील हे मनमोहन देसाई यांचे वडील किकूभाई देसाई जे फ़िल्म डिस्ट्रीब्यूटर होते त्यांच्या ऑफिस मध्ये अकाऊंट्सचे काम बघत होते. पूर्णिमा यांची आई मुस्लिम होती. पूर्णिमा यांना चार बहिणी व एक भाऊ. पूर्णिमा यांची मोठी बहीण शिरीन यांनी १९३०च्या दशकात ‘बम्बई की सेठानी’, ‘पासिंग शो’, ‘ख़्वाब की दुनिया’, ‘स्टेट एक्स्प्रेस’ व ‘बिजली’ अशा चित्रपटात कामे केली होती. […]

ज्येष्ठ मराठी अभिनेते डॉ. काशिनाथ घाणेकर

डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने दंत शल्यचिकित्सक होते. पण त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला डॉ.काशिनाथ घाणेकर यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. संभाजीराजांचा विषय निघाला किवा भालजींचे जुने चित्रपट कुठे सुरु असले कि “डॉ.काशिनाथ घाणेकर”…यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही… […]

ललित लेखिका संजीवनी तडेगांवकर

कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर या मराठीतील एक संवेदनशील मनाच्या भावकवयित्री. त्यांच्या कविता मनाला संमोहित करणारी आहेत. स्त्रियांमधील राधा,मीरेच्या तरल भाववृत्तीला काळजातल्या शब्दातून कवितेत टिपणारी कवयित्री आहेत. त्यांची कविता म्हणजे सर्व वयोगटातील स्त्रियांच्या मनातली घुसमट व्यक्त करणारी सखी. […]

नानासाहेब धर्माधिकारी

समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण नानासाहेब धर्माधिकारी देत गेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून त्यांनी लोकांचे प्रबोधन केले. धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या असा सर्वांगीण पुरुषार्थाची ओळख त्यांनी स्वतःची ओळख विसरलेल्या समाजाला करून दिली व आजही हे कार्य निष्काम त्यांचे सुपुत्र आदरणीय पद्मश्री डॉ.श्री. अप्पासाहेब धर्माधिकारी व नातू सचिनदादा धर्माधिकारी यशस्वीरीत्या करत आहेत . […]

हिंदी, बंगाली अभिनेत्री इंद्राणी मुखर्जी

सुपरस्टार राजेश खन्ना यांची इंद्राणी मुखर्जी या पहिली हीरोईन होत. १९६६ मध्ये आलेल्या राजेश खन्नांच्या ‘आखरी खत’ या पहिल्या चित्रपटात इंद्राणी मुखर्जी त्यांच्या हीरोईन होत्या. एक अत्यंत देखणी अभिनेत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. राजेश खन्नाबरोबरचा त्यांचा ‘आखरी खत’ हा सिनेमा बऱ्यापैकी गाजला होता. […]

मराठी नाट्य-चित्रपट अभिनेता  ओम भूतकर

ओम भूतकर हा एक मराठी नाट्य-चित्रपट अभिनेता नाटककार आहे. ओमचे शालेय शिक्षण पुण्यातील अभिनव विद्यालय येथे व महाविद्यालयीन शिक्षण बी एम सी सी येथे झाले. […]

मल्याळम चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एम के अर्जुनन

संगीतावरील प्रेमामुळे एम. के. अर्जुनन यांना अर्जुनन मास्टर म्हणूनही संबोधलं जात असे. १९६८ साली त्यांनी ‘कृतापौर्णमी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. २०० चित्रपटांमधील ७०० हून अधिक गाण्यांना त्यांनी संगीतबद्ध केली होती. ए. आर. रेहमान यांना १९८१ मध्ये अर्जुनन यांनी कामाची पहिली संधी दिली होती. […]

अभिनेत्री नंदिता पाटकर

नंदिता पाटकर एक मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. नंदिता यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला आरजे आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.नंदिता या झी मराठी वरील माझे पति सौभाग्यवती या मराठी मालिकेत त्यांनी अभिनय केला होता. […]

1 5 6 7 8 9 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..