१८२७ साली बाजारात आली जगातील पहिली काडेपेटी
माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९१ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. […]
माचिस बाजारात आली त्याला आज तब्बल १९१ वर्षं झाली. या मेणाच्या पृष्ठभागावर घासुन ज्वाला निर्माण करणारी काडेपेटी जॉन वॉकरने तयार केली, अन ७ एप्रिल १८२७ ला पहिली काडेपेटी जगाच्या बाजारात आली. […]
हायकोर्टात प्रॅक्टीस करत असताना त्यांच्याकडे एक केस आली. प्रचंड भावनिक गुंतागुंत असलेल्या या केसचा विषय खूप महत्त्वाचा असून त्यावर चित्रपट होऊ शकतो हे समृद्धी पोरे यांनी जाणलं. त्यानंतर त्यांनी मोठ्या धाडसाने वकीली करत असतानाच ‘मला आई व्हायचंय’ या सिनेमाचं लेखन दिग्दर्शन निर्मिती ही केली. समीक्षकांसह प्रेक्षकांनी गौरविलेल्या या चित्रपटाने अनेकांना भुरळ घातली. या चित्रपटाचा विषय होता ‘सरोगेशन’ म्हणजेच गर्भ भाड्याने देणे /घेणे. ज्यावेळी या विषयावर जास्त बोललंही जात नव्हतं तेव्हा या विषयावर त्यांनी ह्या चित्रपटाची कहाणी लिहिली, दिग्दर्शक म्हणून काम पाहिले व अशा विषयावर कुणीच निर्माता मिळत नाही बघून स्वत:च निर्मिती क्षेत्रातही पहिले पाऊल टाकले, आणि पदार्पणातच ‘मला आई व्हायचंय’ या त्यांच्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार, राज्य पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सुध्दा मिळाले. […]
‘ॲन ईव्हनिंग वॉक’ आणि ‘डिस्क्रिप्टिव्ह स्केचिस’ ह्या वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कवितांवर अठराव्या शतकातील इंग्रज कवींचा प्रभाव दिसून येतो. ‘हिरोइक कप्लेट’ आणि ‘स्पेन्सरिअन स्टँझा’ हे अठराव्या शतकातील लोकप्रिय वृत्तप्रकार होते. वरील दोन्ही कविता ‘हिरोइक कप्लेट’ मध्ये रचिलेल्या आहेत, तर ‘गिल्ट अँड सॉरो ऑर इन्सिडंट्स अपॉन सॉल्झबरी प्लेन’ ह्या आपल्या कवितेसाठी त्यांनी ‘स्पेन्सरिअन स्टँझा’चा वापर केला आहे. शीर्षके, शब्दकळा, वर्णने अशा संदर्भातही वर्ड्स्वर्थच्या आरंभीच्या कविता अठराव्या शतकातील इंग्रजी काव्याच्या संकेतांना अनुसरताना दिसतात; पण अशा कवितांतही आत्मनिष्ठेचा एक समर्थ सूर दिसून येतो. […]
मक, बेहलाव आणि मींड या गायनाच्या अंगांवर डॉ.राम देशपांडे यांची हुकूमत आहे. त्यांच्या लयकारी आणि ताना यांबद्दल ते रसिकांत लोकप्रिय आहेत. प्रचलित आणि अनवट रागांचा डॉ.राम देशपांडे यांचा खास अभ्यास आहे. […]
दादासाहेब जोग यांच्या कंपनीने रायगड किल्ल्यावर जावयाचा रोप-वे बांधला आहे. या रोपवेचे उद्घाटन ३ एप्रिल १९९६ रोजी झाले. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडला भेट देणाऱ्या शिवभक्त आणि पर्यटकांसाठी रोप-वे हे महत्वाचे आकर्षण ठरले आहे. रोप-वे बरोबरच तिथे आता निवासाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. […]
त्यांच्या महालात ६००० नोकर होते आणि फक्त झुंबरं साफ करण्यासाठी ३८ माणसं तैनात असायची. १९३७ साली टाईम मॅग्झीनने उस्मान अलीचा उल्लेख ‘Richest Man On Earth’ असा केला होता. त्यावेळी उस्मान अली यांचा फोटो मॅग्झीनच्या कवरवर झळकला होता. मीर उस्मान अली खान यांनी हैदराबादवर १९११ ते १९४८ पर्यंत राज्य केलं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातली सगळी संस्थानं देशात् विलीन करण्यात आली पण हैद्राबादच्या उस्मान अली यांनी हैद्राबाद स्वतंत्र राहील म्हणून सांगितलं. […]
दिलीप वेंगसरकर यांच्या कारकीर्दीतील सर्वात संस्मरणीय क्षण म्हणजे लॉर्ड्सवर साकारलेले सलग तीन शतके. सहा फूट उंचीचा वेंगसरकर एकाग्रतेने स्टान्स घेऊन उभा राहिले की हिमालयातल्या शिळेवर डोळे मिटून तपश्चर्येला बसलेल्या ऋषीसारखाच वाटे. डिफेन्स करण्याची त्याची पद्धत वेगळी होती. डिफेन्स करताना तो फार वाकत नसे. बॉलला बॅटवर लेट येऊ देऊन उभ्या उभ्या संरक्षण करण्याचे त्याचे तंत्र होते. काही वेळेस उभ्या उभ्या खेळण्याने त्याचा घात व्हायचा. पण फलंदाजीच्या बायबलमधले सगळे फटके तो बाळगून होता. मिडअॉन आणि मिडविकेटमधून मारलेला रायफल शॉट त्याचा ट्रेडमार्क होता. त्या दर्जाचा शॉट नंतर द्रविडकडे पाहायला मिळाला. […]
सुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली. […]
पंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे. […]
स्थापनेपासूनच जनसंघाचे कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. अर्थात विविध राजकीय विचारधारा, विशेषतः काँग्रेसची विचारधारा, महाराष्ट्रात प्रचलित असल्याने हे काम तेवढेसे सोपे नव्हते. येथील वाटचालीत जनसंघासमोरील आव्हाने जेवढी मोठी होती, तेवढीच मोठी आव्हाने दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) समोरही होती. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions