नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

आयफेल टॉवरचे उद्घाटन

दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने फ्रान्सवर कब्जा केला तेव्हा फ्रेंच लोकांनी टॉवरच्या लिफ्टच्या केबल कापून टाकल्या होत्या. हेतू हा की हिटलर येईल तेव्हा त्याला पायऱ्या चढत टॉवरवर जावं लागेल. हिटलर आला, पण तो आयफेल टॉवरवर काही गेला नाही. म्हणून फ्रेंच लोकं गंमतीने म्हणतात की हिटलरने पॅरिस जिंकलं पण त्याला आयफेल टॉवर काही जिंकता आला नाही! […]

माजी व्हाईस ॲ‍डमिरल भास्कर सदाशिव सोमण

गोवा मुक्ती संग्रामातील ‘ऑपरेशन विजय’ मोहिमेत नौदलाची सर्व जबाबदारी सोमणांकडेच होती. भास्कर सोमण हे भारताचे दुसरे नौदलप्रमुख. वयाच्या अठराव्या वर्षी त्यांची रॉयल इंडियन मरिनसाठी निवड झाली आणि त्यांना प्रशिक्षणासाठी ग्रेट ब्रिटनला पाठविण्यात आले. अडीच वर्षांच्या प्रशिक्षणानंतर ऑगस्ट १९३४ ला सब लेफ्टनंट म्हणून ते तत्कालीन भारतीय नौदलात प्रविष्ट झाले. १९३९-४० दरम्यान दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते फर्स्ट लेफ्टनंट होते. […]

सरकारी वकील उज्ज्वल निकम

उज्वल निकम यांच्या कडे भारतातील हाय प्रोफाईल केसेस असतात. त्यामुळे त्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. झेड सुरक्षा असलेले उज्वल निकम हे भारतातील एकमेव वकील आहेत. उज्वल निकम यांच्या सभोवताल ४७ शस्त्रधारी कमांडो नेहमी असतात. […]

जागतिक इडली दिवस

इडलीचा जेव्हा विषय येतो तेव्हाअप्रत्यक्षपणे साऊथचे म्हणजे दक्षिण भारताचे नाव समोर येते. पण असे म्हणतात इडली इंडोनेशियातून भारतात आलेली आहे. इडलीला खूप जूना इतिहास आहे. पाक शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते ८०० ते १२०० इ.पूर्वमध्ये भारतात इडली आली आहे. ‘इडली’ शब्दा ची निर्मिती ‘इडलीग’ यापासून झाली होती. याचा उल्लेख ‘कन्नड’ साहित्यात आढळतो. […]

लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके

वास्तवाच्या अनुभवातून आलेले अस्वस्थपण मांडणे ही त्यांच्या कवितेची खासियत. जेव्हा जेव्हा हे मांडणे कवितेच्या चौकटीत सामावणारे नव्हते, तेव्हा तेव्हा त्यांनी कथात्म-वैचारिक लिखाणातील शक्यता अजमावल्या. ‘अधोलोक’, ‘प्रतिबद्ध आणि मर्त्य’ या कादंबऱ्या असोत वा ‘मालटेकडीवरून..’सारखे ललित लेखन असो किंवा ‘कवितेविषयी’, ‘कविता म्हणजे काय?’, ‘मराठी नाटक आणि रंगभूमी : विसावे शतक’ आदी समीक्षाग्रंथ असोत; डहाके यांच्या लेखनात विविध विषयांच्या तौलनिक अभ्यासातून आलेल्या मूल्यगर्भ चिंतनाची डूब जाणवते. […]

राष्ट्रीय पेन्सिल दिवस

वॉल्ट डिस्ने घरात व ऑफिसमध्ये अनेक ठिकाणी पेन्सिली मुद्दाम ठेवे. कोठेही व केव्हाही कल्पना सुचली की भिंतीवर लगेच तो लिहून ठेवी. एडिसन स्वत:साठी खास लांबीने लहान असलेल्या पेन्सिली बनवून घेई. मोठय़ा पेन्सिली कोटाच्या खिशाच्या शिलाईत अडकतात अशी तक्रार करे. हेमिंग्वे लेखनाचा मूड बनवण्यासाठी पेन्सिली तासणे सुरू करे. रोज दोन पेन्सिली तरी लिहून संपवण्याचा त्याचा प्रयत्न असे. […]

तबलावादक पंडित रामदास पळसुले

महाविद्यालयात शिकत असताना स्नेहसंमेलन, फिरोदिया करंडक स्पर्धा अशा निमित्ताने त्यांचे तबलावादन सुरू होते. या काळात त्यांनी विजय कोपरकर, धनंजय दैठणकर, अरविंद थत्ते, सुभाष कामत अशा कलाकारांना साथ केली. त्या काळात त्यांना सच्चिदानंद फडके आणि आनंद बदामीकर यांचे मार्गदर्शन मिळाले. […]

‘रेडिओ सिलोन’ च्या हिंदी सेवेची ७१ वर्षे

१९४९ ते ६०च्या कालखंडात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी सिनेमागीतांना बंदी असताना रेडिओ सिलोनने ती सारी गाणी घराघरात पोहोचवली. आशिया खंडातल्या विविध भाषांमधल्या ३५ हजार ओरिजनल रेकॉर्डस सिलोनच्या संग्रही असून, विविध भारतीकडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्सचा त्यात समावेश आहे. […]

गजलनवाज भीमराव पांचाळे

भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम गायन केले आहे. भीमराव पांचाळे यांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. […]

कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा.गो.मायदेव

कविवर्य वासुदेव गोविंद ऊर्फ वा.गो.मायदेव यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला. कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची ‘गाइ घरा आल्या’ ही सुंदर कविता. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला ‘वनमाळी’ मात्र काही घरी आलेला नसतो. कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न […]

1 76 77 78 79 80 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..