जाहिरातकार व ललित लेखक सुरेश नावडकर
स्मिता तळवलकर यांच्या ‘तू तिथं मी’ या चित्रपटासाठी स्थिरचित्रण व जाहिरात दोन्ही कामे सुरेश नावडकर यांनी केली. हा चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला. या कामाबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. […]
स्मिता तळवलकर यांच्या ‘तू तिथं मी’ या चित्रपटासाठी स्थिरचित्रण व जाहिरात दोन्ही कामे सुरेश नावडकर यांनी केली. हा चित्रपट सुवर्णमहोत्सवी ठरला. या कामाबद्दल त्यांना दुसऱ्यांदा राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. […]
राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती इ. अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. म्हणूनच तिचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. […]
पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध. […]
ब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण पद्धती मात्र पूर्वीची ब्रिटिशांचीच होती. स्वतंत्र भारताचा कारभार क्षमतेने चालवायचा तर शिक्षण पद्धती भारतीयच हवी, हा विचार पुढे आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळेच प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. तसेच महाराष्ट्र राज्य शालान्त शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. या मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) १९४९मध्ये आजच्या दिवशी सुरू झाल्या. […]
मुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो. […]
२०१० सालच्या फिफा विश्वचषकाच्या काळात त्यानं भलतीच झेप घेतली. २९४० ट्विट्स प्रति सेकंद इतक्या गतीनं लिहिले जात होते. त्याच्या आदल्या वर्षी गायक-नर्तक मायकेल जॅक्सन याचं गूढ निधन झालं. त्या वेळी मायकेल जॅक्सन हे दोन शब्द लिहीपर्यंत ट्विटरचा सव्र्हर संगणक मोडून पडत होता. एका तासात एक लाख इतक्या गतीनं ट्विट्स त्या वेळी लिहिले गेले. […]
जेमिनी गणेशन यांनी १९५७ साली ‘मिस मेरी’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते. त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. […]
मो.ग. रांगणेकरांच्या ‘चित्रा’ साप्ताहिकात पाध्ये रुजू झाले. या साप्ताहिकातून पाध्यांनी राजकीय विषयांवर व्यासंगपूर्ण लिखाणास आरंभ केला. याशिवाय हरिभाऊ मोटे यांच्या ‘प्रतिभा’ साप्ताहिकात पाध्ये साहित्यिक घडामोडींवर लिहीत असत. […]
वसुंधरा पौडवाल यांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं ते नाटय निकेतनच्या ” भटाला दिली ओसरी ” या नाटकात. मो. ग. रांगणेकर या नाटकाचे लेखक, निर्माते व दिग्दर्शक. त्यांनीच वसुंधराबाईना रंगभूमीवरील अमिनयाचे पहिले धडे दिले, त्या त्यांना म्हणूनच गुरुस्थानी मानत असत. नाटय निकेतनमध्ये त्यांचा चांगलाच जम बसला. मुख्य म्हणजे त्यांच्या अंगच्या अभिनयाचा उत्तम विकास झाला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions