विनोदी लेखक पांडुरंग लक्ष्मण ऊर्फ बाळ गाडगीळ
बाळ गाडगीळ यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली. त्यांच्या ’लोटांगण’ या पहिल्याच विनोदी कथासंग्रहाला पु.ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’ या पुस्तकाबरोबर राज्य सरकारचा पुरस्कार विभागून मिळाला होता. ’एकच प्याला, पण कोण?’, ’अखेर पडदा पडला’, ’फिरकी’, ’वशिल्याचा तट्टू’ अशा अनेक पुस्तकांनाही लोकप्रियता मिळाली होती. सिगरेट व वसंतऋतू’ या त्यांच्या प्रवासवर्णनाला राज्य सरकारचे पहिले पारितोषिक मिळाले. […]