जागतिक निद्रा दिन
शांत झोप झाल्याने मेंदू ताजा-तवाना राहतो. नियमित कामात मन चांगले लागते. कामावर लक्ष्य केंद्रीत होते. कामं चांगले होतात. म्हणून झोपेची काळजी घेणे आवश्यक आहे. झोप चांगली लागावी म्हणून काही व्यायाम, औषधे सुचवली जातात. झोपेमुळे शरीराचे कार्य चांगल्या पद्धतीने होण्यास मदत होते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ६ ते ९ तास झोपणे आवश्यक असल्याचे अनेक मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर सांगतात. स्लीप हायजिन’ पाळणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. […]