ज्येष्ठ क्रिकेटपटू नरी कॉन्ट्रॅक्टर
१९६२ साली भारतीय क्रिकेट संघ वेस्टइंडिज दौऱ्यावर गेला होता. वेस्ट इंडिज चे गोलंदाज त्यावेळी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करायचे आणि त्या दौऱ्यात देखील अपेक्षेप्रमाणे त्यांनी तेज गोलंदाजी केली. परिणामी बरेच भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले त्यात त्यावेळचे भारतीय कर्णधार नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा देखील समावेश होता त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं, त्यावेळी परदेशी असलेल्या या भारतीय खेळाडूला रक्ताची गरज होती तेव्हा वेस्ट इंडिज चा खेळाडू फ्रॅंक वोरेल सर्वात आधी रुग्नालयात पोहचवला आणि इतकेच न्हवे तर त्याने रक्तदान देखील केले होते. […]