नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

शिक्षणतज्ज्ञ स्नेहलता दसनूरकर

स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती. […]

ज्येष्ठ क्रिकेटपटू सर व्हिवियन रिचर्ड्‌स

च्युइंगगम चघळत चघळत रिचर्ड्‌स नुसता मैदानात येताना दिसला की गोलंदाजांना धडकी भरायची. त्या च्युइंगगम चघळणार्या चेहेऱ्यावर एक कमालीचा थंडपणा असायचा. जंगलात सिंह जसा आजुबाजुला कोण आहे याची पर्वा न करता येतो तसा तो यायचा. तो त्या मैदानावरचा राजा असायचा. उगाचच नाही त्याला किंग म्हणायचे. त्याच्या चेहेऱ्यावर येताना कमालीचे तुच्छ भाव असायचे. तोंडातुन तो एक चकार शब्द नाही काढायचा […]

जगातील पहिला अंतराळवीर युरी गागारीन

१२ एप्रिल १९६१ रोजी गागारिन अंतराळात जाणारा सर्वप्रथम माणूस ठरला. पृथ्वीच्या कक्षेबाहेर युरीने ८९ तास ३४ मिनिटे भ्रमण केले. पुन्हा प्रुथ्वी वर उतरताना सात हजार फुट उंची वरुन ते कँप्सुल च्या बाहेर येऊन पँराशुटच्या साह्याने पृथ्वी वर उतरले. या पराक्रमाबद्दल त्याला अनेक देशांचे पुरस्कार मिळाले. […]

अमेरिकन ग्रॅंडमास्टर रॉबर्ट जेम्स बॉबी फिशर

फिशरचे खेळणे नेहमी आक्रमक असे. त्याने कधीही प्रतिर्स्पध्याने ऑफर केलेला ‘ड्रॉ’ स्वीकारला नाही. तो शेवटपर्यंत झुंजत राही. त्याने भाग घेतलेल्या सगळ्या टुर्नामेंटस मोठ्या फरकाने जिंकल्या. त्याच्याबद्दल कॅस्पोरोव्हने म्हटलं आहे की, ‘फिशर आणि त्याचे समकालीन यांच्यातील फरक वेगवेगळ्या बुद्धिबळ जगज्जेत्यांमधील फरकांपेक्षा मोठा होता.’ […]

मनसेचा वर्धापनदिन

२००८ साली मराठीच्या मुद्द्यावर रान पेटवलं. ते नाणं खणखणीत निघालं. आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मनसे हरुनही जिंकणारी बाजीगर ठरली. लाखालाखाची मतं घेत मनसेनं शिवसेनेचे उमेदवार पाडले. मनसेचे तब्बल १३ आमदार निवडून आले. मुंबईत तर सहा जागा जिंकल्या. २०१० च्या कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेचे २७ नगरसेवक निवडून आले. […]

पत्रकार अनंत भगवान दीक्षित

वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं. […]

नो स्मोकिंग डे

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या (WHO) मते धूम्रपान आणि तंबाखूमुळे दरवर्षी 7 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. […]

ज्येष्ठ जादूगार विजय रघुवीर उर्फ जादूगार रघुवीर ज्युनियर

इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा प्रथम वापर त्यांनी जादूमध्ये आणला. ते त्या काळी एलईडी दिव्यांचा कोट वापरीत. भूत व ड्रॅगन यांची फाईट हा त्यांच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे. ‘डोळे बांधून मोटारसायकल चालविणे’ हा गाजलेला प्रयोग, ही त्यांची खासीयत होती. […]

ज्येष्ठ तबला वादक झाकिर हुसेन

आंतरराष्ट्रीय कलाकारांमध्ये जॉन मॅक्लॉलिन, मिकी हार्ट, हर्बी हन्कॉक, एरिक हर्लंड या आणि अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर झाकीर हुसेन यांनी सहवादन केले. त्यातूनच त्यांना वैश्विक स्तरावर उत्तरोत्तर लोकप्रियतादेखील मिळत गेली. त्याचबरोबर भारतीय गायक-वादकांबरोबर त्यांचे जगभर दौरेही सुरू राहिले. सत्तर आणि ऐंशीची दशके अशी होती तेव्हा भारतातील संगीत तर सातासमुद्रापार जात होतेच, परंतु जागतिक पातळीवर अनेक सांगीतिक प्रवाह एकमेकांना प्रभावितही करीत होते. झाकीर हुसेन यांनी या दोन्ही प्रकारच्या सांगीतिक प्रवाहात आपले विशिष्ट स्थान निर्माण केले होते. […]

संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमदखान पठाण उर्फ डॉ. यु. म. पठाण

संत साहित्य, शिलालेख यांच्या अभ्यासाबरोबरच लघुकथा, ललित लेख, व्यक्तिचित्रे हे वाङ्मयप्रकार त्यांनी लीलया हाताळले आहेत. ‘मराठवाड्यातील मराठी शिलालेख’ या ग्रंथात त्यांनी १२० शिलालेखांचं संपादन केलं आहे. या व्यतिरिक्त साहित्य संस्कृती मंडळाने प्रसिद्ध केलेला फारशी – मराठी अनुबंध, सुफी संतांचं मराठी साहित्य, राज्य मराठी भाषा विकास संस्थेनं प्रकाशित केलेला मराठीतील पहिला मराठी – फारशी व्युत्पत्ती कोश, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं प्रकाशित केलेला ‘मराठी बखरीतील फारशीचं स्वरूप’ या ग्रंथांचा समावेश आहे. […]

1 93 94 95 96 97 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..