नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

जागतिक श्रवण दिन

कर्णबधीरता व श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी तसेच श्रवणशक्तीचा काळजी घेण्याविषयी जागरूकता वाढविण्यासाठीच तीन मार्च हा दिवस जागतिक स्तरावर श्रवण दिन म्हणून साजरा केला जातो. […]

शालिवाहन शक संवताची सूरवात

हिंदू नववर्षाची आणि मराठी नववर्षाची सुरवात म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो. गुढी पाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची रचना केली. विक्रम संवत याच दिवशी सुरू झाले, आणि शालिवाहन शकही याच दिवशी सुरू झाले. मराठी नववर्षाचा प्रारंभ हाच दिवस मानला जातो. […]

उत्क्रांतिवादाचा जनक चार्ल्स डार्विन

चार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती व विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रशुद्धरीत्या उलगडून दाखवले. वेगवेगळे प्राणी कसे निर्माण झाले या विषयावरच्या त्याच्या Origin of Species या प्रकाशित झालेल्या शोधप्रबंधाच्या १२५० प्रति एका दिवसात खपल्या. हा सिद्धांत बायबलच्या विरुद्ध जात होता. त्याचा निषेध करण्यासाठी १८६० मध्ये ऑक्सयफर्डमध्ये विल्बर फोर्स या बिशपने सभा बोलावली. […]

सुप्रसिद्ध लेखिका गौरी देशपांडे

कथा, कादंबरी, ललित लेख, स्फुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत. […]

विनोदी लेखक, नाटककार तारक मेहता

‘दुनिया ने उंढा चष्मा’ या नावाचा त्यांचा मूळ गुजराती स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला होता. स्तंभलेखन, नाट्यलेखनही त्यांनी केले होते. गुजराती रंगभूमीवरही ते लोकप्रिय होते. ‘सब’ वाहिनीने २००८ पासून तारक मेहता यांच्या लोकप्रिय सदरावर आधारित एका मालिकेची सुरुवात केली. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेद्वारे एक वेगळीच दुनिया आणि तारक मेहता यांच्या लेखणीतून साकारलेले कलाकार प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. […]

जेष्ठ विनोदी अभिनेते मधु आपटे

बोबडे बोल हा एकमेव गुण असुनही केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे मधू आपटे हे एकमेव कलावंत असतील. मधुकर शंकर आपटे हे मधू आपटे यांचे पुर्ण नाव. […]

जोसेफ सिरिल बमफोर्ड – जेसीबीचा निर्माता

‘जेसीबी’ हे जगातलं पहिलं यंत्र जे कुठल्याही नावाशिवाय बाजारात लाॅंच झालं.. साल होतं १९४५. ज्यांनी हे धूड बनवलं ते अनेक दिवस चिंतित होते की याचं नाव काय ठेवायचं? शेवटी याचं वेगळं नाव न ठेवता त्याच्या इंजिनचंच नाव वापरूया यावर शिक्कामोर्तब झालं.. इंजिनाचं नाव होतं जेसीबी..हे नाव ज्यांनी हे इंजिन शोधलं त्याची अद्याक्षरं होतं.. शोधकर्त्याचं नाव होतं जेसीबी अर्थात ‘जोसेफ सिरिल बमफोर्ड’. […]

अभिजात वास्तुशिल्पकार लॉरी बेकर

१९४३ च्या सुमारास इंग्लंडला परतीचा प्रवास करण्यासाठी बेकरजी मुंबईला आले आणि त्यांची परतीची बोट ३ महिने लांबली. मुंबईत त्यांची महात्मा गांधींशी भेट झाली. हा तरुण बिटिशांच्या शुश्रूषेकरिता स्वतःचा व्यवसाय बाजूला टाकून मायदेश सोडून तीन वर्षे राहतो याचे गांधींना विलक्षण कौतुक वाटले . पहिल्याच भेटीत दोघे कमालीचे जवळ आले. […]

कादंबरीकार व कथा लेखक प्रा. राम शेवाळकर

महाभारतातील स्त्रीशक्ती, स्वातंत्र्यवीर सावरकर, योगेश्वर कृष्ण, सीता, दुर्योधन, रामायणातील राजकारण, विनोबा भावे, ज्ञानेश्वरी, अवसेचे चांदणे, कानडा तो विठ्ठलू, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचा प्रतिभाविलास भाग १ आणि २. ज्ञानेश्वरांचा चित्विलासवाद, ज्ञानेश्वरांचा नारायणीयधर्म, पसायदान, समाधीसोहळा, ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग भाग १ आणि २, अमृतसरिताः संस्कृत साहित्याचा आस्वादक प्रवाह, या त्यांच्या अत्यंत अभ्यासपूर्ण आणि विचारप्रवण ध्वनिफिती आहेत. […]

कादंबरीकार व कथा लेखक ह. मो. मराठे

ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाच्या संपादक मंडळात होते; त्यानंतर ते लोकप्रभा, घरदार, पुढारी, मार्मिक आणि नवशक्ती अशा अन्य नियतकालिकांकडे गेले. रडतखडत चाललेल्या लोकप्रभा साप्ताहिकाला त्यांनी ऊर्जितावस्था आणून दिली. […]

1 95 96 97 98 99 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..