विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल
जय हरि पांडुरंग विठ्ठल
कनवाळू माय ब्रह्मांडाची
सावळा जगजेठी विठ्ठल
दंगुनी आषाढ़ी कार्तिकी
नाचतो वाळवंटी विठ्ठल
पदन्यास तो वैष्णवांचा
ध्यास पाऊलांना विठ्ठल
गरजता टाळमृदंग चिपळी
नाद घुमतो विठ्ठल विठ्ठल
नेत्री पाझरते रुपड़े सावळे
श्वासाश्वासात भास विठ्ठल
नाही कुठे अंतरी भेदभाव
द्वैतअद्वैत एकरूप विठ्ठल
सुखदुःखाचेच परिमार्जन
अवघे ब्रह्म साक्षात विठ्ठल
— वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. १५५.
२५ – ६ – २०२२.
Leave a Reply