किशोरीताई गेल्या….. यानंतर मनात बरेचसे प्रश्न उपस्थित झाले….. अाज माझ्यासकट सगळेच सौजन्याने अादरार्थी संबोधतो , पण सहेला रे मधली एखादी तान वा रंगी रंगला ची तान कानावर पडली की अापसूकंच काय गळा अाहे हिचा! असंच वाक्य येतं ना ? लता , अाशा काय गाते असंच येतं ना ? या सगळ्या थोर कलाकारांशी अापण अापली तुलना करुच शकणार नाहि , पण तरीहि ते सगळे एकेरी संबोधण्याएवढे जवळचे वाटतात , हो ना ?
अापल्या नेहेमीच्या अायुष्यात बर्यावाईट प्रसंगानुरुप एक निसर्ग वगळता कुठलंच पार्श्वसंगीत नसतं , तरीही संगीताच्या साथीने अालेले सूर अायुष्य व्यापून टाकतात….. रात्री एकटं असताना मुकेश सखा असतो , दुपारी माध्यान्ह समयी कुमार गंधर्व झुळुक बनून येतात , माहौल विशिष्ट असेल तर पंकज उधास असतो , अाणि २४ तासांत कधीही तानपुर्याचा रेंगाळणारा सूर अाणि किशोरीसारखा कुणाहि शास्त्रीय संगीताशी निगडित अावाज अापल्याला अंतर्मुख करून जातो…..
असं म्हणतात की चौर्यांऐंशी लक्ष योनीपैकी शेवटचा जन्म माणसाचा अाणि तेंव्हा ईश्वराकडून मोक्ष मागून घ्यावा….. पण अापण सारेच इतके भाग्यवान अाहोत की अारक्षणामुळे बरबटलेला असला , कितीहि समस्या असल्या तरी अापण भारतात जन्मलो याचा कुणीहि हेवा करावा ! अगदी अंगावरच्या कपड्यांपासून ते खाण्यापर्यंत अाणि अायुष्य व्यापून उरलेल्या अभिजात भारतीय गाण्यापर्यंत अापण किती भाग्यवान अाहोत याची जाणीव होते !
१४ जानेवारी २००८ ला अाम्हि मित्र शिवरायगडवर होतो अाणि काहि मित्रांनी खवचटपणे “तू कवी अाहेस ना , मग अात्ता एक कविता करुन दाखव बघू!” असं म्हटलं , तेंव्हा मी म्हटलं अरे कविता सुचणं हे त्याची किमया अाहे , मी कविता *पाडंत नाहि!पण प्रयत्न करतो !” असं म्हणून केलेली एक चारोळि ऐकवतो :
शिवरायगड…..
तुमच्या ३६० किल्ल्यांपैकी प्रत्येक किल्ला सर होताना मला पहायला अावडलं असतं ,
पण त्याहिपेक्षा जास्त , रायगडाच्या पायरीचा चिरा होऊन रहायला मला अावडलं असतं !
माझ्या मनुष्य जन्मावर मग मी हत हसंत पाणी सोड असतं ,
कारण येता जाता शिवराय , तुमचं पाऊल माझ्यावर पडलं असतं!
याच धर्तीवर अाज असं वाटतंय ,
किशोरीताईंच्या तानपुर्याची खिट्टी म्हणून जरी जन्म मिळाला असता ना , तरी अायुष्य सफल झालं असतं , गानसरस्वतींनी हाताळणं अाणि मग त्यांच्या गळ्यातून येणार्या अविरत सुमधूर स्वरांनी चिंब होणं यापरतं मोठं भाग्य कुठलं महाराजा !
किशोरीताई , माझ्यासारख्या { शास्त्रीय संगीतातील ठोंब्या } तमाम संगीतप्रेमींना सुरांनी चिंब भिजवलंत अाणि अाज जाता जाता डोळे तुडुंब पाण्याने भरून अामच्याच अासवांनी अाम्हाला भिजवलंत ! दाटलेल्या कंठानी एवढंच म्हणतो : अवघा रंग एक झाला , रंगी रंगला श्रीरंग…..
उदय गंगाधर सप्रे(म)
ठाणे
Leave a Reply