विजयदुर्गचे ज्येष्ठ उद्योजक आंबा बागायतदार,सामाजिक कार्यकर्ते अविनाश गोखले यांचा जन्म २२ जून १९४१ रोजी झाला.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अविनाश गोखले यांचे विजयदुर्ग मध्ये खूप मोठे सामजिक कार्य आहे. विजयदुर्गच्या विकासात त्यांच्या इतका पाठपुरावा करून काम करून घेतलेला मी तरी बघितला नाही. बालपण ते आत्तापर्यत त्यांचा विजयदुर्गच्या प्रत्येक वाटचालीत मग तो जेट्टीविस्ताराचा विषय, विजयदुर्ग किल्ल्याची डागडुजी करण्यासाठी निधीचा विषय,एस.टीचा विषय, त्यांचा प्रत्येक वेळी हातभार राहिला आहे. १९८० मध्ये विजयदुर्ग दूरध्वनी केंद्र येण्यासाठी त्या खात्याला दर सोमवारी पोस्ट कार्ड लिहून त्याचा पाठपुरावा करून एक दिवस विजयदुर्ग दूरध्वनी केंद्रास (Telephone Exchange) मंजुरी मिळवून घेतली.व जागा नाही म्हणून कारण नको म्हणून आपले बंधू सुरेश गोखले यांच्या घरातील जागा उपलब्ध करून दिली. या प्रमाणेच १९८२ पर्यंत विजयदुर्ग येथे कुठल्याही बँकेची शाखा नव्हती,त्याचा पण पाठपुरावा करून व कुटुंबांची नाराजी ओढवून आपल्या घराची ओटी पडवी देऊन बँकेची शाखा सुरु केली, व ती बँक आज उत्तम प्रकारे चालू आहे.
शिक्षणाच्या बाबतीत विजयदुर्ग मध्ये माध्यमिक विद्यालय होण्यासाठी अविनाश गोखले यांनी जीवाचे रान करुन परवानगी आणली. त्या वेळी मंत्रालयात परवानगी साठी ते दादा राणेंच्या आमदार निवासात त्यांचे विजयदुर्गतील मित्र गुंडू वाडये यांच्या सोबत दिवस दिवस काढून तत्कालीन मंत्री भाई सावंत आणि विजयदुर्ग मधील इतर शिक्षक याचे मदतीने ती परवानगी मिळवली. तेथेही पण जागेचा प्रश्न भेडसावत होता, तोही एका दमात मार्गी लावुन धुळप यांच्या वाड्यात शाळा सुरु केली.
१९९४/९५ मध्ये रत्नागीरीच्या चौगुलै स्टीमच्या माल बोटी त्यांच्या मेटेन्सस साठी सलग दोन वर्ष विजयदुर्गच्या बंदरामधे आणून विजयदुर्गतील साठ सत्तर मुलांना रोजगार मिळवून दिला, रोजगार वाढीसाठी एकवेळ संप केला, तो संप गोडी गुलाबीने मोडून काढण्यास कॅ.दिलीप भाटकर यांचे अविनाश गोखले यांच्याशी खास मैत्रीचे संबध असल्याने शक्य झाले. आजही अविनाश गोखले यांनी विजयदुर्गतील तरुण पिढीला कायम प्रोत्साहन देत असतात. ते त्यांचे कायमच मेंटॉर राहिले आहेत. अविनाश गोखले हे विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे गाव कार्यकारिणीचे अध्यक्ष राहिले आहेत.
करोनाच्या आधी दर वर्षी ‘विजयदुर्ग महोत्सव’ तसेच करोनाच्या काळात रक्तदान शिबीर यशस्वी करण्यात त्यांचा मोलाचा हातभार आहे. या त्यांच्या सर्व कार्यात त्यांच्या पत्नी सौ. गोखले यांची कायम साथ मिळाली.
अविनाश गोखले यांना आपल्या समूहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply