केशवा-माधवा तुमच्या नावात बहु गोडवा
एकसारखे दोघे असती
मित्रांसंगे रोज खेळती
कधी न पटे ओळख
रोज नवा दावा ।।
आवळे-जावळे दोघे बंधू
कुठला केशव, कुठला माधव
संभ्रमीत जरी म्हणती
उपाय शोधू नवा ।।
पिता न्याहळी निज पुत्रांसी
उजव्या गाली तीळ एकासी
सांगे पत्नीसी शोध नवा ।।
आज तुमच्या ध्यानी आले
कधीच खूण मी ही जाणियली
केशवा-माधवा संस्कारिते
धन्य माय माऊली ।।
— सुधा नांदेडकर
Leave a Reply