
बरेच जण जेवणानंतर फळे खातात पण ते पचनासाठी फारसं फायदेशीर नसते,जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. फळेनेहमी जेवणाच्या काही वेळेपूर्वी खायला हवीत तसेच सकाळी नाश्त्यापूर्वी फळ खाणेसर्वाधिक फायदेशीर असते. जेवणानंतर लगेच अंघोळ करणं देखील आरोग्यास चांगलेनसून अंघोळ करताना हात – पाय सक्रिय झाल्याने या भागातील रक्तप्रवाह वाढतोतसेच पोटातलाही रक्तसंचार वाढल्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते.
जेवणानंतर अनेकांना भरपूर पाणी पिण्याची सवय असते परंतु तेही शक्यतो टाळावं,जेवणानंतर साधारण ३० ते ३५
मिनिटांनी पाणी प्यायलेलं कधीही चांगलं असतं.कारण जेवताना किंवा लगेच जेवणानंतर पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रियाप्रभावित होते.
जेवणानंतर काही लोकांना चहा पिण्याची पण सवय असते. पण तसं करणं देखीलतुमच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणातआम्ल असते. यामुळे पचनावर वाईट परिणाम होऊन पचनक्रिया प्रभावित होते म्हणून जेवणानंतर चहा हवाच असेल तर तो किमान दोन तासांनी प्यायला हवा.जेणेकरून तुमच्या पचनक्रियेवर त्याचा विपरित परिणाम होणार नाही.
— संकेत प्रसादे
Leave a Reply