नवीन लेखन...

जेवणानंतर लगेच या गोष्टी करणे टाळा

Related imageसर्वसाधारणपणे जेवण झाल्यानंतर अनेकांना सिगारेट ओढण्याची सवय असते किंवा लगेच झोपण्याची सवय असते. पण एका संशोधनाने हे सिद्ध झालेले आहे की तुमच्या आरोग्यासाठी नेमक्या याच गोष्टी हानीकारक आहेत. कारण संशोधकांच्या मते यागोष्टी केल्याने त्याचा थेट तुमच्या पचनक्रियेवर परिणाम होतो. सिगारेट ओढल्याने तुमची फक्त पचनक्रियाच बाधीत होत नाहीतर यामुळे कॅन्सरचाही धोका वाढतो आणि तसेही सिगरेट ओढणे ही सवयच मुळात वाईट आहे तसेच जेवणानंतर तुम्ही लगेच अंथरुणावर पडलात किंवा लगेच झोपी गेलात तर तुमची पचनक्रिया थांबते. अन्न पचायला नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो, जेवण केल्यावर लगेच झोपल्याने गॅसव आतड्यांच्या समस्या वाढू शकतात. म्हणूनच जेवण झाल्यानंतर साधारण ३० मिनिटांनी चालायला गेल्यास   त्याचा अन्न पचनासाठी नक्कीच फायदा होतो आणि वजनही आटोक्यात राहते.
बरेच जण जेवणानंतर फळे खातात पण ते पचनासाठी फारसं फायदेशीर नसते,जेवणादरम्यान किंवा जेवणानंतर फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाही. फळेनेहमी जेवणाच्या काही वेळेपूर्वी खायला हवीत तसेच सकाळी नाश्त्यापूर्वी फळ खाणेसर्वाधिक फायदेशीर असते. जेवणानंतर लगेच अंघोळ करणं देखील आरोग्यास चांगलेनसून अंघोळ करताना हात – पाय सक्रिय झाल्याने या भागातील रक्तप्रवाह वाढतोतसेच पोटातलाही रक्तसंचार वाढल्यामुळे पचनक्रिया प्रभावित होते.
जेवणानंतर अनेकांना भरपूर पाणी पिण्याची सवय असते परंतु तेही शक्यतो टाळावं,जेवणानंतर साधारण ३० ते ३५
मिनिटांनी पाणी प्यायलेलं कधीही चांगलं असतं.कारण जेवताना किंवा लगेच जेवणानंतर पाणी प्यायल्यास तुमची पचनक्रियाप्रभावित होते.
जेवणानंतर काही लोकांना चहा पिण्याची पण सवय असते. पण तसं करणं देखीलतुमच्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकतं. चहाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणातआम्ल असते. यामुळे पचनावर वाईट परिणाम होऊन पचनक्रिया प्रभावित होते म्हणून जेवणानंतर चहा हवाच असेल तर तो किमान दोन तासांनी प्यायला हवा.जेणेकरून तुमच्या पचनक्रियेवर त्याचा विपरित परिणाम होणार नाही.
— संकेत प्रसादे
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..