नवीन लेखन...

आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग तेरा

चर्चे पे चर्चा हो रही है,
आयुर्वेदात सांगितलेला प्रमेह जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.
खरंतर आधीच्या टीपांमधून हा विषय सांगून झाला आहे.
काही गटामधे विचारलेल्या शंका आणि त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न करतो.

परत एकदा सांगतो.
माझा कोणत्याही पॅथीशी वाद नाही. पण एवढं मात्र नक्की की आयुर्वेदात काय सांगितले आहे ते समजून तरी घेऊया.

परत परत त्याच शंका विचारल्या जात आहेत, याचा अर्थ मला नेमकेपणाने काय म्हणायचं आहे ते नीट समजले नसावे. एकतर मला नीट सांगता येत नसावे, किंवा वाचणाऱ्याने समजून घेण्याचा प्रयत्न केला नसावा. असो. पुनः एकदा सांगतो. कोणतेही, कोणाचेही गैरसमज नसावेत

शंका- प्रमेह आणि डायबेटीस एकच आहे का ?

नाऽऽही.
प्रमेह हा मुख्य आजार त्याचे कफ पित्त आणि वात यांच्या विकृतीनुसार, क्रमशः दहा, सहा आणि चार असे प्रकार पडतात. त्यातील वाताच्या चार प्रकारापैकी एक म्हणजे मधुमेह. जो इंग्रजी भाषेतील डायबेटीसशी मिळता जुळता सांगितला जातो. त्याची निश्चिती ही रक्त आणि लघवी तपासणीनंतर केली जाते.
या रक्त लघवी तपासणीमधे साखरेचे अंश आढळतात. ही तपासणी लॅबमधे केली जाते. ज्यांचे निकष ( नाॅर्मल व्हॅल्युज ) हे दर काही वर्षांनी बदलणारे असतात. बदलत असतात. आम्ही जेव्हा महाविद्यालयात शिकलो, तेव्हाचे नाॅर्मल व्हॅल्युज आणि आता सांगितले जाणाऱ्या नाॅर्मल व्हॅल्युज यामधे भलीमोठी तफावत आढळते. बरोबर आहे ना !

जेव्हा आयुर्वेदीय ग्रंथ लिहिले गेले त्या काळात उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करून तपासण्या सांगितलेल्या होत्या. यामधे लघवीची तपासणी, घामाची क्लिन्नता, मुंग्या लागणे, तैलबिंदू परीक्षा इ. परीक्षा सांगितलेल्या होत्या. पण काळाच्या ओघात या तपासण्या मागे पडल्या. आणि आज रसायनशास्त्रातील प्रगतीमुळे, नवनवीन तपासण्या सुरू झाल्या. परंतु त्या अजूनही पूर्णपणे विश्वासार्ह नाहीत, हे आपण वाचले आहे. (यालाही कोणाचा विरोध नसावा. असल्यास सांगावा. ) मग डायबेटीस मधे जी औषधे आजच्या प्रचलीत व्यवस्थेमधे आहेत, त्याचे दुष्परिणाम भोगत आयुष्याच्या शेवटपर्यंत औषधे खात जगायचे. (असे मी म्हणत नाही. अॅलोपॅथीमधील तज्ञ डाॅक्टर आपल्या औषध चिठ्ठीवर तसे लेखी लिहूनही देतात. कारण ते सत्य आहे. )

शंका- मधुमेहामधे रक्तातील साखर तपासणी कितपत योग्य आहे ???

रक्त तपासणी ही आताची टेक्नाॅलाॅजी आहे. त्यावेळी ही तपासणी नव्हती, पण लघवी, घामामधून गोड पदार्थ बाहेर पडतात.असे आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले आहे. मधुमेहातील रक्त तपासणी योग्य की अयोग्य, हे सांगणे कठीण आहे. पण विश्वासार्ह नक्कीच नाही.

शंका – आयुर्वेदानुसार मधुमेहात कोणत्या तपासण्या सांगितलेल्या आहेत ?

आयुर्वेदात सांगितलेलेल्या मूत्र परीक्षेवर अधिक संशोधन होणे गरजेचे आहे. आयुर्वेदात सांगितलेले म्हणजे सगळे टाकावू आणि कालबाह्य असा समज नसावा. दुसऱ्या पॅथीची भलावण करत असताना, आपण आपल्या शास्त्राचा किती गांभीर्याने अभ्यास केलाय, हे आधी पहावे.
आधुनिक वैद्यकाच्या काही महत्वाच्या पुस्तकातही diabetic mellitus मधे मूत्रपरिक्षण व मूत्रशर्करेच परिक्षण महत्वाचं मानलेलं आहे.

आयुर्वेदातही वातज प्रमेह, मधुमेह, असाध्यच सांगितलेला आहे…..आयुर्वेद /भारतीय जीवनशैली अवलंबुन आपण प्रमेह होऊ नये याची काळजी घेऊ शकतो…

Lifestyle disorder म्हणुन गणला जाणाऱ्या या रोगापासुन लांब राहायचं असेल किंवा या आजाराचे लेबल लागलेले असेल तर लाईफस्टाईल मॅनेजमेंट म्हणजे आयुर्वेदोक्त जीवनशैली अवलंबणे हेच हितावह आहे

या विषयावर बोलावं तेवढं थोडंच आहे. जशी दृष्टी तशी सृष्टी. सर्वांना निरामय गोड जीवनासाठी शुभेच्छा.

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.02.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..