नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग आठ

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 4

आपण अवलंबून रहात असलेल्या रिपोर्ट मधला फोलपणा आपल्याला काही वेळा दुसरे निदान करायला भाग पाडतो. निदानच बदलले तर चिकित्सा पण बदलत जाते, पथ्यपाणी बदलते.
आयुर्वेदाचा एखाद्या रोगाच्या चिकित्सेमागील दृष्टीकोन लक्षात यावा यासाठी हे लिहितोय.

म्हणून वैद्य जेव्हा रूग्णांची तपासणी करतात, तेव्हा रिपोर्ट तपासणे, हा कार्यक्रम सगळ्यात शेवट पार पाडतात. पण रूग्णांना काय कौतुक असते, रिपोर्ट दाखवण्याचे ! एवढ्याऽऽऽऽऽ तपासण्या केल्यात ! ही एवढी फाईल. ज्याचा खरंतर त्यावेळेस काऽऽही उपयोग नसतो.

हे सर्व रिपोर्ट का करायचे, तर त्यावेळेस रुग्णाची काय परिस्थिती होती, एवढंच समजण्यासाठी. तो रिपोर्ट ” असा ” का आला याचे उत्तर मात्र कोणाकडेच नसते. तो आत्ताच असा का आला, याचेही उत्तर कोणाकडे नसते. हे कमी आहे, आणि हे वाढले आहे, त्यासाठी आमच्याकडे हे औषध आहे, हे उत्तर मात्र सगळ्यांकडे असतं. फक्त कंपन्यांची नाव फक्त बदलतात. एवढंच !

आयुर्वेदात अश्या काही प्रयोगशालेय चाचण्या सांगितलेल्या नाहीत का ?
आयुर्वेदातील सारे निष्कर्ष हे संशोधनाअंतीच लिहिलेले आहेत. “इदं आगमसिद्धत्त्वात्” असे ग्रंथकर्ते स्पष्टपणे सांगतात. ते म्हणतात,
” हे आम्ही यापूर्वी तपासून बघितलेले आहे, आता यावर पुनः डोके खर्च करू नका. यापुढील संशोधन करा.”
त्वचेची, रक्ताची रंग परीक्षा, लघवीची तेलबिंदू परीक्षा, मलाची परीक्षा करून निदान कसे करावे, हे सुस्पष्ट पणे मांडून ठेवलेले आहे. काळाच्या ओघात यातील काही तपासण्या मागेच राहिल्या, त्यातील मुत्राच्या तैलबिंदू परिक्षणा सारख्या परीक्षांचा वैद्यांनी पुनः अभ्यास करायला हवाय.

थोडं विषयांतर होतंय, पण मनात आलं ते लिहून टाकतो,

कावीळ झालेली नाही, काविळीचे एकही लक्षण रूग्ण सांगत नाही. पण रिपोर्टमधे कुठेतरी विकृती दाखवली जाते, कावीळ वाढू नये म्हणून उगाचच आयुष्यभर पथ्य करीत बसायचे असते का ? रोगापेक्षा रोगाची भीती ही आपल्याला मृत्युकडे लवकर नेणारी असते.

त्यापेक्षा कोणताही रोग होऊ नये यासाठी आपली प्रतिकारक्षमताच एवढी वाढवून ठेवावी, की चुकुन जरी काही वेळा अपथ्य झाले तरी, काहीही होता कामा नये.

चेक बाऊंस होऊ नये यासाठी कसं पुरेसा बॅलन्स अकाउंटमधे ठेवणे आवश्यक असते, तसं आपल्याकडील इंद्रियांच्या सर्व क्षमता एवढ्या वाढवून ठेवायच्या की, चुकुन एखाद्या वेळी एखाद्या रोगाचा सामना करायची वेळ आलीच तर पुरेसा शक्तीचा साठा आपल्याकडे तयार असेल. ऐनवेळी कुठे जाणार ना ! एनी टाईम मनी कधी मिळतील? पुरेसा बॅलन्स असेल तरच !

केवळ अॅण्टीऑक्सीडंटस् घेणे म्हणजे प्रतिकार क्षमता वाढवणे नव्हे हं !
हे सगळं पाश्चात्य डोकं. त्यांना सगळं कसं इन्स्टंट हवं असतं. पाणी विहिरीतून येतं, त्यासाठी ती जमिन खणावी लागते, विहिर बांधावी लागते, तरच विहिरीला असलेले पाणी हवे तेव्हा वापरता येते.

हे कोणाला कळेल ? ज्यांनी कायम टॅप वाॅटरच वापरले आहे त्यांना ? विहिरच बघीतली नाही त्यांना ? मग त्यांच्यासाठी वेगळी गरज निर्माण होते, त्याला ते इन्स्टंट म्हणतात.

एक गोळी टाकली तोंडात की आली एनर्जी. असं कुठाय ? ती काय हवा आहे का ? चाकाला ट्यूब जोडली आणि हवा भरली !

तसं शोधायला गेलं तर आयुर्वेदातील सगळी रसायन औषधे ही अॅण्टी ऑक्सीडंटच आहेत. सगळे मसाल्याचे पदार्थ अॅण्टीऑक्सीडंटच आहेत. असो. पाश्चात्यांची संशोधक वृत्ती मात्र अभ्यासण्यासारखी आहे. छोट्या छोट्या गोष्टींचाही ते अतिशय मनापासून अभ्यास करतात, आणि महत्त्वाचे म्हणजे आपले संशोधन लिहून ठेवतात, इतरांना सांगतात. त्यामुळे पुढील पिढीला त्याचा फायदा होतो. एकदा झालेली चुक टाळता येते.

भारतीय संशोधनातील एक मोठ्ठा दोष हा रहातो, की आमचं डाॅक्युमेंटेशन नीट होत नाही. ज्यावेळी जे गरजेचं आहे, ते केलंय. काहीवेळा, त्याचं महत्व लक्षात येत नाही, काही वेळा, कशाला लिहून ठेवायचं, राहातंय लक्षात. असं म्हटलं जातं.
मग कधीतरी गरज असते तेव्हा इसारलंय म्हटलं की झालं….
भारतीय संशोधक प्रत्येक वेळी चुकतात असं नाही,
आता इस्रोचीच गोष्टच बघा ना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.02.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..