नवीन लेखन...

प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग नऊ

लॅबची कमाल, रिपोर्ट ची धमाल भाग 5

लॅबच्या रिपोर्ट मधे आणखीन एक वाक्य असते.
Results of test may vary from laboratory to laboratory and also in some parameters from time to time, for the same patient.

इतकं खरं कोणच बोलत नसेल. आता हेच बघा ना,
आम्ही ज्या टेस्ट घेतलेल्या आहेत, त्याचे आमच्या लॅबोरेटरीमध्ये जे रिपोर्टस् आले आहेत ते दुसऱ्या लॅबमधे कदाचित वेगळे येऊ शकतात. आणि काही वेळा कदाचित एकाच रुग्णाचे, वेगवेगळ्या वेळी तपासणी केली असता, ते ही रिपोर्टस् वेगळे येऊ शकतात.

भाषा इतकी गोड असते, पण खरं आणि निर्णायक काय आहे, ते अगदी आयएसो प्रमाणित लॅबसुद्धा सांगू शकत नाही. कारणही तसेच आहे. प्रत्येक रुग्णाचे शरीर क्षणाक्षणात बदलत जाणारे असते. त्याची व्याख्या करतानाच शीर्यते तत् शरीरः अशी केली आहे. जे क्षणाक्षणाला क्षरण पावते, किंवा संपत जाते ते शरीर. त्यामुळे प्रत्येक पेशी जी आत्ता आहे ती नंतर बदललेली असते. हे त्रिकालाबाधीत सत्य आहे. त्याला विशिष्ट काळात बंदिस्त करणे कधीही शक्य नाही. त्यामुळे त्याचे रिपोर्टस देखील बदलतेच रहाणार.

यावरून आपण लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच की, लॅबोरेटरीमध्ये तपासून आलेलं शरीर म्हणजे पूर्णत्व नाही. ” शरीराच्या सर्व तपासण्या करून घेतल्या पण कुठेच एकपण फाॅल्ट मिळाला नाही” असं जेव्हा रुग्ण सांगतात, तेव्हा त्यांच्या अपेक्षांची कीव करावीशी वाटते.
सर्व शरीर यंत्राने तपासून मिळते, ही विज्ञानावरची अंधश्रद्धा आहे. असं मी म्हटलं तरी ते चुक ठरू नये.

किती जणांना, किती पद्धतीने आणि कसं समजावून सांगणार की, सर्व तपासण्या हा शब्दच फसवा आहे. सर्वांना असे वाटते आहे की, विज्ञानाला सर्व शरीर समजले आहे. यंत्राने वरून तपासले, किंवा मशीनमधे शरीर घातले, की आतून उत्तर येईल. “हे बघा, इथे फाॅल्ट आहे. इथेच लक्ष द्या.” तर असं नाहीये. हा भ्रम आहे. यालाच आध्यात्मिक भाषेत “माया” म्हणतात. जे आहे ते तसे नाही, या नाव माया.

विज्ञानाला जे काही शरीर समजलेलं आहे, ते खूप मर्यादित स्वरूपात आहे. हे शरीर समजून घेण्यासाठी किती तरी पद्धतीने प्रयत्न सुरूच आहेत. अजूनही हे स्थूल शरीर काय आहे हे कळलेलंच नाही. मग सूक्ष्म शरीराची बातच वेगळी! मन, इंद्रिये, आत्मा तर दूरच राहिले. यांचा प्रत्येकाचा एकमेकांशी, आणि प्रत्येकाचा शरीराशी असलेला संबंध अभ्यासायला एक जन्म पण पुरा पडणार नाही.

हे शरीर ‘आतून’ समजून घ्यायला एक वेगळी दृष्टी लागते, ( जिची चर्चा आपण आधी केली आहे.) ही दृष्टी मिळाली की चिकित्सा कशी करायची, कुठे करायची, का करायची, करायची की नाही, हे सर्व स्पष्ट होत जाते. यालाच मी म्हणतो, आयुर्वेद चिकित्सेमागील दृष्टीकोन! ही दृष्टी सर्वांना लवकरात लवकर लाभो ही प्रार्थना !

वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
19.02.2017

Avatar
About (वैद्य) सुविनय दामले 453 Articles
वैद्य सुविनय दामले हे कुडाळ, सिंधूदुर्ग येथील सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आहेत. ते आयुर्वेद या विषयावर विपुल लेखन करतात तसेच व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..