नवीन लेखन...

आयुष्य आणि किंमत ..

मित्रहो, खरंच आपल्या आयुष्याला किंमत आहे का ? हा प्रश्न साहजिकच आपल्या सगळ्यांना एकदा तरी पडला असेलच.  अनेकदा आपल्या आयुष्यात काही असे कठीण प्रसंग येतात जेव्हा आपण समोरच्याला स्वतः पेक्षा जास्त किंमत देतो पण परतफेड मध्ये तो आपल्याला तशी किंमत देत नाही.

खरंच आपण आयुष्यात ज्या गोष्टीना महत्त्व देतो त्या खरच तितक्या महत्वाच्या असतात का ?? कोणीतरी करतंय.. सांगतंय..वापरतंय म्हणून किंवा त्या गोष्टीबद्दलचा ज्ञानाचा अभाव ह्यामुळे आपण मोहित होऊन आयुष्याची गंगा मालिन तर करत नाही ना..!!   या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.

वाईट गोष्टींना समर्थन केलं की समाजात आपली किंमत कमी होते आणि चांगल्या गोष्टींना समर्थन केलं तर किंमत वाढते. ही जीवनाची रीत आहे. किंमत हा असा शब्द आहे जो आयुष्याला पण लागू होतो आणि एखाद्या वस्तू ला पण.  वस्तू ची किंमत कमी झाली तर चालते पण माणसाची किंमत कमी व्हायला नको.

सुजाण बनून समाधानी जगणे आणि स्वतःच्या आयुष्याची किंमत ओळखणे हे आज गरजेचे आहे …

मित्रहो, अजून सांगायचे झाले तर जिवंतपणी माणसाची किंमत त्यांचे स्नेही कधीच ठेवत नाही.  हो, मी स्नेही हा शब्द मुद्दामून  वापरला कारण आपले काही स्नेहीच तसे वागतात. पण तोच माणूस जर गेला तर त्याची किंमत  त्यांच प्रेम काय होत ते त्यांच्या जवळच्या लोकांना जाणवते. काही लोक वेगळी असतात जसे ज्यांनी आपली जवळची माणसं गमावली आहेत ते लोक आयुष्याची खरी किंमत ओळखतात.

किंमत या बद्दल बोलताना एक सांगायचे आहे की, प्रत्येक माणसामध्ये काहीतरी चांगले वाईट गुण असतात पण जो पर्यंत माणूस जिवंत असतो तोपर्यंत आपले त्याच्याकडे लक्षच नसतं त्याने केलेल्या चांगल्या कामावर आपण पांघरून घालतो .त्याने जे काही आपल्या साठी केले असेल त्याचा आपल्याला विसर पडतो .त्याला भेटण्याची इच्छा असते पण कामाच्या व्यापमुळे आपण त्याला भेटू शकत नाही बर्‍याच वेळा आपल्या जवळ मोबाईल असूनही त्याला फोन करायचं राहून जाते .त्याच्याशी बर्‍याच गप्पा माराच्या असतात पण वेळेअभावी राहून जातात.आणि एक दिवस सकाळी किंवा रात्री फोन खणखणतो व तिकडून आवाज येतो की तो किंवा ती गेली व हे ऐकताच आपला आपल्याच कानावर विश्वास बसत नाही काय करावे ते समजत नाही धरती फाटते की काय असं वाटायला लागते .खाण्याकडे लक्ष जात नाही . डोळ्यातून गंगा जमूना वाहायला लागतात .देहभान विसरतो व सरकन त्याच्या बरोबर घालवलेले क्षण आठवायला लागतात .

त्याने दिलेली मदत त्याचा पाठिंबा त्याचे ते गोड शब्द कानात रूंजी घालतात .त्याचे ते समजावणे समजून घेणे हे सारेच मनाला भूरळ घालतात तो जीवंत असे पर्यंत हे असं कधी वाटलंच नाही पण त्याच्या मरणानंतर त्याची किंमत वाटायला लागली.जीवंत असेपर्यंत त्याला भेटणं टाळत होतो पण त्याच्या मरणानंतर त्याला भेटण्याची इच्छा तीव्र झाली.पण आता तो तर कधीच भेटणार नाही म्हणून जीवंतपणीच माणसाला माणसाची किंमत द्यावी त्याला भेटावे मनमोकळ्या गप्पा माराव्यात .

मन भरून जावं अस भटकायला जावं त्याच्या बरोबर .म्हणजे तो गेल्यावर हळहळ वाटणार नाही.मेल्यानंतर किंमत देण्यापेक्षा जीवंतपणीच त्याला किंमत द्या आदर करा वेळ द्या बघा जमतं का हे सर्व.

या लेखाचा शेवट करण्या आधी मी एकच सांगू इच्छितो की, माणसाने माणसाची किंवा त्याच्या आयुष्याची किंमत ठरावण्या पेक्षा त्याची किंवा त्याच्या आयुष्याची किंमत केली  तर ती खरी माणुसकी ठरेल.

निनाद चंद्रकांत देशपांडे

Avatar
About निनाद चंद्रकांत देशपांडे 9 Articles
माझ्या बद्दल माझे लेख च आपल्याला सांगतील....
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..