दवडू नका आयुष्य तुम्ही, वेळ घालूनी असा तसा,
पदरी येई निराशा तुमच्या, गेला क्षण येईल कसा….१,
मर्यादेतच जीवन असूनी, गतीमान असते बघा,
स्वत: भोवती केंद्रीत होता, कसे जाणाल इतर जगा….२,
ईच्छा असते वाया न जावे, आयुष्य सारे विनाकारण,
हर घडीला विचार असावा, इतरांसाठी असते जीवन….३,
जेंव्हां तुम्ही सेवा करीता, इतर मनाचे भाव जाणूनी,
तेच अर्पण होत असते, सारे एकत्र ईश्वर चरणी …..४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply