नवीन लेखन...

आंनदयात्री कवी मा.बा भ. बोरकर

आज ३० नोव्हेंबर
आज आंनदयात्री कवी मा.बा भ. बोरकर यांची जयंती
देखणी ती जीवने, जी तृप्तीची तीर्थोदके,
चांदणे ज्यातून वाहे, शुभ पार्यासारखे.
असे देखणे जीवन जगणारे, आणि रसिकांना भरभरून आनंद देणारे आंनदयात्री कवी!

जन्म:- ३० नोव्हेंबर १९१९

१९३० मध्ये वयाच्या विसाव्या वर्षीच त्यांचा प्रतिमा हा काव्यसंगह प्रकाशित झाला. त्यांच्या या काव्यसंगहावर केशवसुत, बालकवी, गोविंदागज यांचा प्रभाव विशेषत्वाने जाणवतो. बोरकरांच्या मनावर घरातील धार्मिक वातावरण, प्रेमळ आप्त परिवार, शालेय जीवनातील संस्कार आणि गोव्याचा व कोकणचा रमणीय निसर्ग यांचा खोल परिणाम झालेला त्यांच्या कवितेतूनही दिसून येतो.

निसर्गाच्या भव्योत्कट सौंदर्याचा त्यांना जणू ध्यास जडला होता. निसर्ग हीच त्यांची भाषा बनली; त्यांच्या अविष्काराचे माध्यम बनले. गोव्याच्या निसर्गरम्य भूमीचे वर्णन ते पुढील शब्दांत करतात, – या गोव्याच्या भूमीत मधाचे नारळ असतात. कड्याकपारीतून दुधाचे घट फूटतात; आंब्या फणसांची रास असते. इथे चांदणे माहेरी येते आणि पावसात दारापुढे सोन्या-चांदीच्या धारा खेळतात… किती नितांत सुंदर आणि अत्यंत कल्पनारम्य, पण जिव्हाळ्याने केलेले हे वर्णन आहे! त्यांच्या सर्वच प्रकारच्या लेखनात, विशेषत: कवितेत नियमितपणे निसर्ग डोकावतो. निसर्ग भाषा हेच त्यांचे वेगळेपण.
१९३२ साली बोरकरांच्या कवितेने भारावून जाऊन श्रेष्ठ कवी भा. रा. तांबे यांच्या तोंडून Here is a new star on horisen असे कौतुकाचे उद्गार निघाले. १९३४ मध्ये बडोदा येथील साहित्य संमेलनात तेथे कर माझे जुळती या कवितेसाठी त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

कवीवर्य भा. रा. तांबे यांच्या विचारसरणीचा, काव्यशैलीचा त्यांच्यावर खूप परिणाम झालेला दिसतो. एकलव्यासारखे तांबे यांचे गुरुपद त्यांनी मनोमन स्वीकारले व मानाने मिरवलेही. त्यामुळे तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारे कवी अशी त्यांची प्रतिमा झाली. बोरकरांचे वि. स. खांडेकर, काकासाहेब कालेलकर, कुमार गंधर्व, पु.ल.देशपांडे, चित्रकार दलाल, यांच्यासह म. गांधी, डॉ. लोहिया, पं. नेहरू, योगी अरविंद बाबू यांसारया विविध प्रांतांतील थोर लोकांबरोबर स्नेहपूर्ण नाते होते. त्यामुळे त्यांचे अनुभवविश्र्व व जीवन अधिक समृद्ध झाले. १९६७ साली पद्मश्री हा किताब मिळाला.
बोरकरांच्या संपूर्ण काव्यप्रवासात त्यांची कविता जीवनाच्या गतीनुसार आशयदृष्ट्या समृद्ध होत गेलेली दिसते. ते सौंदर्यलुब्ध मनाचे कवी होते. या सौंदर्यातूनच त्यांना दिव्यत्वाचा, अपार्थिवाचा साक्षात्कार होतो.
दिव्यत्वाची जेथ प्रचीती, तेथे कर माझे जुळती,
यज्ञी ज्यांनी देऊनी निज शीर, घडिले मानवतेचे मंदिर
परी जयांच्या दहनभुमीवर, नाही चिरा नाही पणती,
तेथे कर माझे जुळती.

या कवितेतील मानवतावादामागील सच्चेपणा आपणास आजही भावतो. अतिशय प्रगल्भ व अर्थगर्भ शब्दयोजनेमुळे ही कविता मैलाचा दगड ठरली. ज्ञानदेव गेले तेव्हा, देखणे ते चेहरे, जीवन त्यांना कळले हो अशा एकाहून एक सरस कविता त्यांनी लिहिल्या. स्त्री सौंदर्य आणि प्रेमभावना हेदेखील त्यांच्या कवितांचे प्रमुख विषय होते. त्यांचे गोव्यावर व कोकणी भाषेवरही अतिशय उत्कट प्रेम होते. कोकणी भाषेतही त्यांची बरीच पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील सासाय या कोकणी संगहाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. वास्तवाच्या प्रखर आचेतही बोरकरांच्या कवितेने काव्यात्मतेची स्वप्नील धुंदी टिकवून ठेवली. सुंदरतेच्या श्रद्धेतून, श्रुतिमधूर, गीतधर्मी व भावपूर्ण कवितांसाठी आजही ते आदरपूर्वक ओळखले जातात. मा.बा भ. बोरकर यांचे ८ जुलै १९८४ निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..