बाघ-इ-जिन्हा हे पाकिस्तानातील लाहोर शहरातील एक ऐतिहासिक मैदान आहे. पूर्वी हे मैदान लॉरेन्स गार्डन या नावाने ओळखले जात असे. सध्या मात्र या मैदानाच्या आसपास विविध झाडाफुलांनी बहरलेला मोठा बगिचा आहे. तो बोटॅनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेजारी एक मशिद आहे.
बाजूला असलेल्या व्हिक्टोरियन इमारतीत जिल्हा वाचनालय आहे. करमणूकीची अनेक साधने आणि क्रिकेट शिवाय इतर विविध खेळांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. याशिवाय या जागेवर एक खुले नाट्यगृह उभारण्यात आले असून तेथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम होतात.
सर्व सोयींच्या बरोबर उपहार गृह, टेनिस कोर्ट आणि जिमखाना मैदान आहे. हे मैदान लाहोर येथे लॉरेन्स रस्त्यावर आहे. मैदानाच्या अलीकडे लाहोर प्राणी संग्रहालय आहे, आणि रस्त्याच्या पलीकडे गव्हर्नर हाऊस आहे. या जागेवर पूर्वी केव गार्डनच्या प्रतिकृती प्रमाणे बोटॅनिकल गार्डन बांधण्यात आले होते.
यावेळेस त्याला जॉन लॉरेन्स यांचे नाव देण्यात आले. त्या जागेवर त्यांचा पुतळा उभारण्यात येणार होता परंतु नंतर तो लंडनडेरी कॉलेजच्या बाजूला हलविण्यात आला. जिन्हा गार्डन हे लाहोर मधील १४१ एकर जागेवर वसलेले होते. सध्या ती जागा १७६ एकरांची आहे. परंतु त्यातील बरीच जागा शासकीय प्राणी संग्रहालय, बोटॅनिकल गार्डन, कॉलेज, लाहोर युनिव्हर्सिटी आणि गार्डनच्या आसपास असलेल्या रस्त्यांमध्ये गेलेली असल्यामुळे रस्ते आणि तेथील इमारतींची जागा सोडून थोडीफार झाडी आणि स्टेडियमसाठी सध्या १२१ एकर जागा वापरात आहे.
पाकिस्तानातील बोटॅनिकल गार्डन आणि आसपासची जागा ही विशेष काळजीपूर्वक राखण्यात आली असल्यामुळे ते एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ओळखले जाते. या मैदानाच्या आसपास विविध प्रकारची सुमारे ६०० झाडे लावण्यात आली असून ही झाडे वर्षभर फुलांनी बहरलेली असतात. हे या स्टेडियमचे एक आकर्षण आहे. या पार्क मधील अतिशय प्रसिद्ध असे क्रिकेटचे मैदान हे १८८.५ पर्यंत क्रिकेट सामन्यांसाठी उपयोगात आणले जात होते. कसोटी क्रिकेट सामन्यांसाठी या मैदानाचा उत्कृष्ट दर्जा राखला गेला होता. परंतु नंतर पुढील सर्व सामने हे गड्डाफी स्टेडियम वर होऊ लागले. मात्र अजूनही या मैदानाचे ऐतिहासिक श्रेष्ठत्त्व कमी झालेले नाही.
Leave a Reply