नवीन लेखन...

बाजीराव पेशवे

मित्रांनो १८ ऑगस्ट ही तारखेप्रमाणे *श्रीमंत बाजीराव पेशवे सरकारांची* जयंती आहे. हे निमीत्त साधुन त्यांच्या बद्दल माहीती देण्याचा प्रयत्न आहे. सदर स्वरूपात त्यांच्या पराक्रमाबाबत थोडक्यात माहीती देण्याचा विचार आहे.

शिवराय व शंभुराजे नंतर इतिहासाला दखल घ्यायला लावणाऱ्या या पराक्रमी योध्याला लोकांनी फक्त मस्तानी पुरताच ओळखला आहे. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर हे बाजीरावांनीच केले. दिल्ली पर्यंत मजल मारणारा स्वराज्याचा पहीला पंतप्रधान म्हणुन स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. शेवट पर्यंत छत्रपतींचा सेवक म्हणुनच जगलेला हा योद्धा काळाच्या पडद्याआड गेला.

२० वर्षाच्या वादळी कारकिर्दीत एकही युद्ध न हरलेला हिंदवी स्वराज्याचा एकमेव पेशवा म्हणुन आजही ओळख आहे.

सदस्यांनी आपली पसंती कळवावी.

Avatar
About वसंत चरमळ 52 Articles
श्री वसंत चरमळ हे जय श्रीराम साखर कारखाना येथे व्यवस्थापक असून विविध विषयांवर नियमितपणे लेखन करतात.

1 Comment on बाजीराव पेशवे

  1. नमस्कार.
    पहिल्या बाजीरावाचें स्मरण केलेत, हें योग्यच आहे.
    आणखी थोडें त्याच्या बद्दल ( एकेरी उल्लेख हा केवळ लेखनसोयीसाठीच आहे).
    – बाजीराव एकही लढाई हरला नाहीं. एक म्हणजे, त्याच्या सैन्याच्या movements अतिशय fast असत. दुसरें म्हणजे, त्याची युद्ध-strategy व त्याच्या tactics या वाखाणण्याजोग्या आहेत.
    – पण अखेरीस तो शाहूचा नोकर होता. त्यामुळे त्याला ‘एकछत्री’ कारभार करतां आला नाहीं. पंत-प्रतिनिधी, सेनापती दाभाडे असे अनेक आंतरिक प्रतिस्पर्धी त्याला होते.
    – नागपूरच्या भोसल्यांमुळे त्याला पूर्वेाल जाणें शक्य नव्हतें. प्रिनिधींमुळे त्याला दक्षिण वर्ज्य होती.
    – शाहू हाही कांही firm-minded boss नव्हता. शाहूनें बाळाजी विश्वनाथाचे उपकार स्मरून बाजीरावाला २०व्या वर्षीं ( इतर दरबार्‍यांचा विरोध असतांनाही ) पेशवा केलें. पण बाजीरावाच्या दृष्टिकोनातून, त्याला शाहूचा ऋणी होणें प्राप्तच होतें. त्यामुळे, निझामाचे, युद्धांत पराभव करूनही बाजीराव त्याचा कायमचा खात्मा करूं शकला नाहीं.
    – सरदारांनी युद्ध स्वखर्चानें करायचें; पण लूट मात्र सरकारजमा करायची (म्हणजेच ऐशोआरामी शाहूच्या खजिन्यात भर घालायची ) , त्यांत, आणखी हें अंतर्गत राजकारणी-कलह , व शाहूचा मुझल, निझाम यांच्याबाबतीत असलेला soft corner, यांमुळे युद्धें जिंकूनही बाजीराव कर्जबाजारी झाला.
    – व्यक्तिगत, कौटुंबिक बाजूनेंही बाजीरावाला पिडलें होतें. त्याचे विचार काळाच्या पुढे होते. ते पुण्यातील बुरसटलेल्या विचारांच्या ब्राह्मणांनाच काय, पण बाजीरावाच्या आईला व भाऊ चिमाजीला कळलेंच नाहींत, पटलेच नाहींत. बाजीराव-पुत्र नानासाहेबही चिमाजीच्या पक्षात होता.
    -मस्तानीच्या बाबतीत तर चिमाजीनें तिला कैदेत टाकून बाजीरावाला फारच मानस्ताप दिला. ‘You too Brute ‘ अशासारखे कांहीं विचार नक्कीच बाजीरावाच्या मनात आले असतीलच.
    – त्यामुळे तो उद्विग्न झालेला होता,आणि त्या तिरीमिरीतच त्यानें नदीत स्नान केलें व तो आजारी पडला.
    – त्याच्या आाजारातही चिमाजीनें मस्तानीला पाठवलें नाहीं. ही गोष्टही त्याच्या मनाला लागली असणारच, व ती त्याचा मृत्यू accelerate करायला कारणीभूत ठरली.
    – बाजीरावाच्या मृत्यूनंतर मस्तानीनें आत्महत्या केली ही गोष्ट बोलकी आहे.
    -मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलें तर, बाजीरावाच्या मृत्यूला राधाबाई व चिमाजी हेच जबाबदार आहेत.
    – थोडक्यात काय, तर, शाहूचें अकर्तेपण, पुण्याच्या ब्राह्मणांचें बुरसटलेपण, आई राधाबाई व धाकटा भाऊ चिमाजी यांचे जुनाट विचार, यां सरवांनी अतिशय यशस्वी योध्याचा अकाली अंत केला.
    -मला वाटतें की पानिपत हा मराठेशाहीच्या इतिहासात जेवढा Turning Point होता ; तेवढाच महत्वाचा होता बाजीरावाचा ४० व्या वर्षीं झालेला अकाली मृत्यू.
    – असें म्हणतात की, एखादी society खाली जायला लागते, तेव्हां, त्याकाळीं- लगेचच तें कळत नाहिीं . मात्र, नंतर मागे वळून पाहणार्‍यांना स्पष्ट दिसतें, की हाच तो Turning Point होता, ज्यामुळे या societyचा अपकर्ष सुरूं झाला. तसा तो Turning Point, बाजीरावाचा,अकाली झालेला मृत्यू , हा होय. आपण जर पानिपतची दीर्घकालीन कारणें पाहिली, तर, बाजीरावाच्या मृत्यूनंतर झालेल्या मराठेशाहीतील बदलांमध्ये ती दडलेली आहेत, असें दिसून येईल.
    – बाजीरावाला मानाचा मुजरा .
    स्नेहादरपूर्वक,
    सुभाष स. नाईक.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..