बॉलिवूड मधील ‘बाबूजी’ आलोकनाथ यांचा जन्म १० जुलै १९५६ रोजी झाला.
आलोकनाथ हे नाव ऐकलं तरी आपल्यासमोर उभी राहते ती सोज्वळ अन् शांत माणसाची प्रतिमा. ‘हम आपके है कौन’, ‘हम साथ-साथ है’ आणि ‘विवाह’ यांसारख्या हिट सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका साकारणारे आलोकनाथ प्रत्येक मालिका आणि सिनेमांमध्ये वडिलांची भूमिका चोख पार पाडतात.
त्यांनी करिअरमधील प्रत्येक सिनेमात आणि मालिकेत सर्वाधिक भूमिका केवळ वडिलांच्याच साकारल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी १०० पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत. एवढेच नाही तर, एक डझनपेक्षा जास्त टीव्ही मालिकांमध्ये झळकले आहेत.
१९८६ मध्ये प्रसारित होणा-या ‘बुनियाद’मध्ये मास्टर हवेली राममधून टीव्ही करिअरला सुरूवात करणारे आलोकनाथ यांना तरुण दिसण्याची संधी मिळाली होती. त्यांनी बॉलिवूडमध्ये ‘गांधी’ सिनेमामधून एंट्री केली. या सिनेमात त्यांच्या पात्राचे नाव तौय्यब मोहम्मद होते. त्यानंतर ‘कामीग्नि’मध्ये त्यांनी नायकाची भूमिका साकारली. या सिनेमात त्यांच्यासह गतकाळातील प्रसिध्द अभिनेत्री टीना मुनीम होत्या. याव्यतिरिक्त आलोकनाथ यांनी ‘विवाह’, मेरे जीवन साथी’, ‘मैने प्यार किया’, ‘कयामत से कयामत तक’, ‘दयावान’, ‘सपने साजन के’, ‘तिरंगा’, ‘दीवाना’, ‘हम आपके है कौन’, ‘परदेश’, ‘जीत’, ‘मुझे कुछ कहना है’, ‘कभी खुशी कभी कम’सारख्या सिनेमात वडिलांच्या भूमिका साकारून बॉलिवूडचे ‘बाबूजी’ झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply