सरडा चढला झाडावरती,
सर् सर् सर्, करीत ।
लक्ष्य त्यांचे फूलपाखरू,
फुलाभोवती होते खेळत ।।१।।
भक्ष्यकाची चाहूल मिळतां,
भर् भर् भर् गेले उडूनी ।
शोषीत असता गंध फुलांतील,
चंचल होते नजर ठेवूनी ।।२।।
व्याघ्र मावशी मनी ,
म्याँव म्याँव करीत आली ।
उंदीर मामा दिसता तिजला,
झेप घेण्या टपून बसली ।।३।।
शंका येता त्याला किंचित,
झर् झर् झर् तो बिळांत गेला ।
केवळ चित्त सावध असतां,
प्राण आपले वाचऊ शकला ।।४।।
निसर्ग देतो कला आगळी,
बचाव करण्या शत्रू पासूनी ।
सावध असतां जीव जीवाणू,
मारू न शकते त्याला कुणी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply