नवीन लेखन...

बदलणारं अस्तित्व

तिच्या घरापासून थोडी लांब एक छानशी जागा होती. तिथे भरपूर आणि उंच झाडं, झाडांना लपेटलेल्या वेली, त्यावरील वेगवेगळ्या रंगाची, गंधाची फुलं आणि या सगळ्यावर मुक्त विहार करणारे, किलबिल करणारे पक्षी. या सगळ्या गोष्टी जेवढ्या ठळक तेवढंच त्यांच्या विरुद्ध असणारा एक डोहं ही होता तिथे. ठरावीक आकार, रंग, रूप नसलं तरी नितळ आणि थंड पाण्याचा डोहं. त्याच्या त्या नितळपणात आजूबाजूला असणाऱ्या झाडं, फुलांचा ठसा त्यात दिसत होताच पण त्याचं नितळपणात त्या डोहाच्या तळाला असलेले रंगीत दगड, मासे, वनस्पती ही त्याच्या काढावरून दिसायचे. नेमका त्याचा हाच सच्चेपणा तिला आवडायचा आणि म्हणूनच तिचा – तिचा वेळ मिळताच या डोहाच्या काठावर येऊन ती त्याच्या नितळपणातून त्याच्या आतील आणि बाहेरील जग पहात बसायची. कधीतरी त्या डोहात आपली नाजूक पावलं सोडून बसल्यावर डोहातील थंड पाणी तिच्या मनालाच काय डोक्याला ही शांत करायचं. त्यातील रंगीत मासे तिच्या पायाला स्पर्शून काहीतरी सांगू पहायचे. त्यांची भाषा समजण्यापेक्षा त्याचं व्यक्त होणं तिला जास्त आवडायचं. व्यक्त होण्याचं माध्यम फक्त भाषाच नसते. स्पर्शातून ही व्यक्त होता येतेच. पण त्या भावना समजणारं माणूस सगळ्यांनाच नाही होता येत. ती त्याचं व्यक्त होणं समजून घ्यायची, त्या डोहाला ही ऐकायची त्याच्या बरोबर काही वेळ घालवायची आणि मग आपल्या घरी परतायची. ते काही सुंदर क्षण तिला दिवसाचा बाकीचा वेळ सुसह्य करून द्यायचे. तिला आता सवयच लागलेली त्या जागेची, त्या वातावरणाची आणि त्या नितळ डोहाची. ती रोजच त्याच्या काठी येऊन बसू लागली, हितगुज करू लागली. कधी रडली ही त्याच्या जवळ तर कधी भांडली ही त्याच्याशी, पण त्याची साथ रोज अनभवू लागली. पुढे पुढे तिला वाटू लागलं की आपण एकदा यात अपादमस्तक डुंबुया का? तिला पोहता येतं नव्हतं. मुळात बुडू नये म्हणून पोहणं ही प्रक्रिया असते. पण तो तिला त्याच्यात बुडवून टाकेल याची भिती नव्हतीचं आणि म्हणूनच तिला तो आवडत होता. गेल्या बऱ्याच दिवसात तिला तो डोह चांगलाच माहीत झालेला, पाठ झालेला होता.

ती त्या डोहात मनसोक्त भिजायचा एक दिवस ठरवते आणिया त्या दिवशी फार आनंदात त्याच्या काठाशी येते. ती त्याच्या काठावर उभी रहाते आणि त्यात ती उडी घेणार तोच तो डोहं अचानक लहान होतो. इतका लहान की ती त्यात समावूच शकली नसती. झेप जाताना सवरणं जास्त महत्वाचं आणि ती सावरते ही स्वःताला आणि विस्मयक नजरेने त्या डोहाला न्याहळू लागते. रोज छान सहवास देणारा, छान वाटणारा तो डोहं क्षणात असा कसा बदलला? तो ती जागा सोडून नाही गेला, पण त्याचं आधीचं असलेलं अस्तित्व त्याने फार संकुचीत केलं. फार बदलला तो अचानक. मी नाही असं नाही पण मी आहे हे पण आता या वेगळ्या रुपात हे जणू तो तिला सांगू लागला. तिला समजे ना की काय झालं या डोहाला? असा कसा हा बदलला? तिला तो आधी आवडायचा तसा तो राहिलाच नव्हता. नुसतं अस्तित्व टिकवून ठेवण्याला अर्थच नसतो तर त्यात वेगळेपण लागतं, आणि तेच तो आता गमावून बसला होता. त्याने ते मुद्दामून गमावले होते का? काही समजत नव्हतं तिला. अर्थात ती हिरमुसली. फार कमी गोष्टीत आनंद मानणारी किंवा फार कमी गोष्टी आपल्या मानणारी ती परत एकटी पडल्यासारखी झाली. का त्या डोहाने आपलं अस्तित्व बदललं? आपण त्यात जास्त रमत गेलो हे त्याला आवडलं नाही का? का आज आपण त्यात पूर्णपणे भिजणार होतो हे त्याला आवडलं नाही? असंच असावं बहुतेक. आपण काठावरच राहायला पाहीजे होतं बहुतेक. थोडक्यात मिळणाऱ्या सुखात आनंद मानायला पाहीजे होता आपण. तिने हेच सगळे प्रश्न त्याला विचारले, पण तो काही बोलला नाही. तो तसाच शांत आणि नितळ होता आपलं आकारमान बदलून पण ते बदललेलं अस्तित्व जपून आणि राखून…..

-रुपाली चेऊलकर

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..