पिढी गेली रूढी बदलली, बदलून गेले सारे
क्षणा क्षणाला बदलून जाते, मन चकित करणारे….१,
सुवर्णाचे दाग दागीने, हिरे माणके त्यात
पिढ्यान पिढ्याचे मोल राहती, श्रीमंतीचा थाट….२,
चमचम आली तेज वाढले, नक्षीदार होवूनी
फसवे ठरले आजकालचे, क्षणक जीवन असुनी….३,
हासणारी ती फुले बघीतली, आणिक इंद्र धनुष्य
नक्कल करता निसर्ग कलेची, दिसे त्यात ईश….४,
ओबड धोबड बटबटती ते, रंग पसरवी सारे,
कुणा न कळे आधुनिक कला, ही फसती ज्याला बिचारे….५,
नाद मधूर हा प्रवाह वाहे, हृदयस्पर्शी जो असे
जीवंत वाटते काव्य सदैव ते, ज्ञान भरले ज्यात दिसे….६,
अर्थ काय आणि भाव कोणता, उलघडण्याचे कष्ट पडे
नव काव्याची चाल कशी ही, वाटते सर्वांना कोडे….७,
जे जे होते सुंदर मौलिक, दृष्टी आड चालले
सवंगपणा आणि नाविन्यात, आत्मा तोच विसरले…८
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply