बडवे मंडळींचा कारभार, जगदंबेच्या नांवें चालतो
भाविकामधील अज्ञानाचा, उपयोग तो करूनी घेतो…१,
पूजेमधल्या विधी करिता, आग्रह त्यांचा चालत असे
भक्तीरसाचे महत्त्व असूनी, त्याच्यांत त्यांना रस नसे
व्यवहारीपणाचे रूप आणूनी, बाजारी वृत्ति ती दाखविती
धर्माचे ते नाव लावूनी, भोळ्या भक्तांना लुटत असती
पुरोहित तो असा असावा, धर्माची तो करि उकलन
भक्तीमार्गाच्या वाटसरूंना, योग्य मार्ग ते देयी दाखवून,
प्रभूचे मंदिरी नेवून त्यानें, चिंतन करण्या सांगावे
चंचल मनास प्रभू भजनीं, एकाग्र करण्या शिकवावे…५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply