बघता तुला प्रिया रे ,–
जिवा बेचैनी येते,
कासाविशी होता हृदयी,
आत मोरपीस हलते,–!!!
विलक्षण ओढ तुझी,
काळजाला किती छळते,
मूर्त माझ्या अंतरीची,
अढळ अढळ होतं जाते,–!!!
स्पर्श होता तुझा सख्या,
माझी न मी असते,
बाहूंत तुझ्या विसावण्या,
किती काळ मी तरसते,–!!!
तुझ्यातच सारे विश्व माझे,
जगही तोकडे भासे,
तुझ्याचसाठी राजसा,
मन्मनीचा चकोर तरसे,–!!!
उषा आणि संध्या,
आपले रंग उधळती,
प्रेम रंगाचाच वर्षाव,
भास्करावरती करिती,–!!!
रात्र येते चंदेरी ती ,
जेव्हा जवळ तू असशी,
जिवापाड जाऊन तूही,
प्रीत” माझ्यावर करशी,–!!!
धुंद रात्रीची मदमस्त किमया,
प्रेमात नखशिखांत नहाते,
आभाळीची चटोर चांदणी,
प्रेम–लीलेसाठी धडपडते’–!!!
हिमगौरी कर्वे©
Leave a Reply