माझ्या शेतात बहावा,
मोहरफुलांनी सजला,
आस डोळ्यात ती दाटं,
वाट पावसाची पाही…..!
कसा फुलला बहावा,
साज सोनेरी चढवुन,
जशी हळदिची नवरी,
बसली सजुनं धजुनं …!
फुलवा बहाव्याचा सांगे,
मेघराजाच स्पंदनं….
त्याच आगमन दमदार,
की तो बसेल रूसुनं….!
भिन्न पात्रे निसर्गाची,
पशु,पक्षी,झाडे वेली…
रंगमंच निसर्गाचा,
भुमिका जगती वेगळाली….!
©गोडाती बबनराव काळे, लातुर
9405807079
सर, बहावा वर खूप साऱ्या कविता आहेत. तसा फार लोकप्रिय वृक्ष आहे. कवी मनाला साद घालणारा आहे. माझा बहावा वृक्षावर एक लेख मराठी सृष्टीवर नुकताच प्रकाशित झा आहे. असो. कविता उत्तम आहे.
धन्यवाद सर……!