बाहेरून नागपूरले येणाऱ्या लोकायसाठी जरूरी सूचना
१. नागपूरात येवून आपला शायनेपना दाखवू नये. इथं पहिलेच अतीशायने लोकं राहतात.
२. पुणेवाल्या लोकायनं आम्हाले दुपारी एक ते चार झोपाचा फालतू सल्ला देवू नये. दुपारी आम्हाले खूप सारे कामं रायते.
३. नागपूरातल्या दुकानदारांशी जास्त वाद घालू नये. नाहीत् सामान भेटन नाहीच, उलट झोडपे भेटतीन.
४. आम्ही दुपारी एक ते चार ट्रॅफिकचे नियम पाळत नाई. कारण विचारू नये. तुम्हाले उत्तर दयाले आम्ही दबेल नाही.
५. इथल्या लोकायसमोर उगाच तुमच्या श्रीमंतीचा ताव मारू नये. तुमच्या पैशात आम्हाले जरासा बी इंटरेस्ट नाही.
६. मुम्बई अन् पुणेवाल्यांनी तर आम्हाले काम कमी करणारे आळशी म्हनू नये. आम्ही कितीही रिकामचोट असलो तरी तुमच्यापेक्षा पोटभर जेवतो.
७. नागपूरवाल्यायले अविकसित समजू नये. मनाची श्रीमंती हाच आमचा विकास.
८. नागपूरातल्या पोरी तोंडाले फडकं बांधून फिरतात म्हणून उगाच दात दाखवू नये. तो आमचा खाजगी प्रश्न आहे. अन् तुम्हाले तोंड दाखवाची जबाबदारी अजून आम्ही घेतलेली नाही.. समजलं..?? नाहीत् भर मे महिन्यात कामठी रोडावर नंग्या पायानं चालाची शिक्षा करण्यात येईल.
९. आमच्या भाषेले अजिबात हासाचं नाही. तुम्ही जर मराठीत विचारलं त् मराठीतच उत्तर भेटन. आमच्या भाषेत ‘का बे ‘ चा अर्थ ‘काय दादा’ असा होते.
१०. आमच्या रंगावर बिलकुल जायचं नाही. मूळचे आम्ही गोरेच आहो. हा इथल्या उनाचा परिणाम आहे.
!! धन्यवाद भाऊ.. दे खर्रा!!
एकचं नंबर सर अवडलंय आपल्याले. भाषा हि भाषा असते अन नागपूरचा लोकनले प्रमाण भाषेची काही गरज नाही . जय विदर्भ