नवीन लेखन...

बहिणीची हाक

राखण करीतो पाठीराखा,  भाऊ माझा प्रेमळ सखा,
विश्वासाचे असते नाते,  एकाच रक्तामधून येते ।।१।।

आईबाबांचे मिळूनी गुण,  तुला मला हे आले विभागून,
हृदयामधली ज्योत त्यांच्या, तेवत आहे आज आमच्या ।।२।।

प्रकाश झाला परंपरेनें,  त्याला माहित पुढेच जाणे,
मार्ग जरी भिन्न चालले,  मूळ तयाचे खालीं रूजले ।।३।।

अघात पडतां तव वर्मी,  दु:खी होऊन जाते बघ मी,
दिसत  नाही कुणा हे बंधन,  जीव श्वासाचे अतूट स्पंदन ।।४।।

भांडत रूसत हासत होतो,  जगण्यामधला भाग असे तो,
खेच खेचता ढील सोडतां,  सुटत नाहीं मग तो गुंता ।।५।।

बाह्यांगीं तूं दूर आहे जरी,  तव प्रतिमा ही राही अंतरी,
बघत राहते तुझी भाऊबीज,  आठवणीत मी जगते आज ।।६।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..