२२ फेब्रवारी १९३३ महाशिवरात्रीचा दिवस, रत्नागिरीच्या भागेश्वर मंदिरात सभा होती. प्रमुख पाहुणे कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे होते.शिवू दलित आरती म्हणत होता. वीठया दलित गीतेचा आठरावा अध्याय खणखणीत आवाजात म्हणत होता.त्याच्या शेजारी भागोजी कीर बसले होते. त्यानीच सावरकरांच्या प्रेरणेने पतीतपावन मंदिर उभारले होते. कर्मवीर शिंदे भाषणास उभे राहिले व म्हणाले “ ज्यांनी ही अपूर्व सामाजिक क्रांति घडवून आणली त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना ईश्वराने माझे उर्वरित आयुष्य दयावे अशी मी पार्थना करतो. माझे अपुरे कार्य हेच पूर्ण करतील.”कर्मवीर शिंदे ब्रम्हओ समाजाचे होते ते १९०८ पासून अस्पृश्यता निवरणाचे कार्य करत होते. दिवसभर ते दलित वस्त्यात फिरत होते. व माहिती गोळा करत होते.
सावरकर यांना या कार्यात विरोध नव्हता असे मुळीच नव्हते. पण चिकाटीने आणि तळमळीने सावरकर यांनी हे कार्य चालू ठेवले होते. दलित मुलांना शाळेत एकत्र बसवावे या साठी जिल्हाधिकाऱ्याकडून तसा आदेश काढला. दलिता बरोबर गाभाऱ्यात जाऊन पूजा करवली. सत्यशोधक समाजाचे बागल म्हणाले “जे कार्य आम्ही कोल्हापुरात करू शकलो नाही ते सावरकर यांनी रत्नागिरीत करून दाखवले. असा नेता आम्हाला मिळाला असता तर आम्ही त्याला डोक्यावर घेऊन नाचलो असतो.” सावरकर यांनी आदेश दिला की माझा वाढदिवस अस्पृश्यता निवारण म्हणून पाळा.” व कार्यकर्ते यांना सूचना केली की घरोघर जाऊन पत्रके भरून घ्या की “मी सार्वजनिक व खाजगी जीवनात अस्पृश्यता पाळणार नाही.”
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)
Leave a Reply