सावरकर विज्ञाननिष्ठेचे कट्टर पुरस्कर्ते होते. कोणतीही गोष्ट विद्यानाच्या कसोटीवर पारखल्याशिवाय ती आचरणात आणायची नाही ही त्यांचे सांगणे होते. राष्ट्राची प्रगती व्हावी व ती विज्ञाननिष्ठेनेच होईल अशी त्यांची धारणा होती.
”यंत्राने बेकारी वाढते का ?,आजच्या सामाजिक क्रांतीचे सूत्र, ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय , खरा सनातन धर्म कोणता, गोपालन म्हणजे गोपूजन नव्हे हे सावरकर यांच्या विज्ञान निष्ठेचे द्योतक होते. यापुढे हिंदू समाजाचा उत्कर्ष होईल तो विज्ञानाच्या बळावर असे सावरकर सांगत.
त्यांनी भारतीय इतिहासाचा बारकाईने अभ्यास केला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की बुद्ध पूर्व काळात हिंदुस्तान सर्व जगात पुढारलेला देश होता. प्लॅस्टिक सर्जरी,मोठ्या नौका,आयुर्वेद , ही सगळे विज्ञानाच्या कसोटीवर परखलेले होते. पुढे आक्रमण करणाऱ्यानी ते ग्रंथ जाळले, इंग्रजांनी जे जे भारतीय ते ते बूरसाटलेले हे जाणून बुजून पसरवले. परदेश गमन निषिद्ध ठरवले. आपली प्राचीन विज्ञान शास्त्राची परंपरा खंडित झाली. उद्योगधंदे बुडाले.
तुमच्या चळवळीला ईश्वराचे अधिष्ठान नाही तर ती यशस्वी कशी होणार ? याला चोख उत्तर म्हणून सावरकर यांनी “ईश्वराचे अधिष्ठान म्हणजे काय ?” हा लेख लिहिला. सावरकर यांनी परदेशात अनुभवले की युरोप अजिंक्य झाले कारण यंत्रबळावर आपल्या समाजातही यंत्र चळवळ सुरू व्हायला हवी असे सावरकर यांना वाटे. म्हणून त्यांनी “यंत्र “ विषयावर तीन लेख लिहिले भूकंप,दुष्काळ,अतिवृष्टी या गोष्टी निसर्गाने होतात पापामुळे नाही असे ते म्हणत.
— रवींद्र वाळिंबे.
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई)
Leave a Reply