नवीन लेखन...

बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – १५ – सावरकरांचे द्रष्टेपण

ज्याला पुढे काय घडणार आहे (विचारमंथनाच्या तर्कबुद्धीच्या आधारावर, ज्योतिषाच्या आधारवर नव्हे ) हे  समजते त्याला द्रष्टा म्हटले जाते. सावरकरसुद्धा असेच द्रष्टे होते. तीस चाळीस वर्षानंतर काय घडू शकेल हे सावरकर अचूक सांगू शकत होते. जन्मठेपेवर सावरकरांना अंदमान येथे नेण्यात आले,तेव्हा त्यांच्या मनात आले की अंदमान समुद्रात अश्या ठिकाणी आहे की समुद्राच्या दृष्टीने त्याचे महत्व कधीही कमी होणार नाही. आज त्यांचे द्रष्टेपण खरे ठरले आहे. आज तेथे नाविक व वैमानिक तळ उभारले जात आहेत. १९२४ साली सावरकर रत्नागिरीत स्थानबद्ध होते. त्यांना राजकारणाची बंदी होती. तेव्हा “ तळमळणारा आत्मा “ या टोपण नावाने नागपूरच्या “ स्वातंत्र्य “ मध्ये सिंध मधील लोकाना उदेशून  “काय अजूनही निजलात ?” हा प्रदीर्घ लेख लिहिला. इंग्रजांच्या फोडा आणि झोडा नितीप्रमाणे सिंध जर मुंबई प्रांतापासून वेगळा केला तर तो घातक असेल त्यामुळे सिंधीचा  सर्वनाश ओढ्वेल म्हणून तो प्रांत वेगळा करू नका असे सांगितले

दुसऱ्या महायुद्धात सप्टेंबर १९४१ मध्ये चर्चिलने अटलांटिक सनद (वसाहतीना स्वातंत्र्य द्यायची मुभा) भारताला लागू नाही असे चर्चिलने सांगितले.सावरकरांनी उत्तर  दिले की हिंदुस्थानचे भवितव्य आता चर्चिलच्या हाती नाही. ते युद्धदेवतेच्या हाती आहे. आणि याचा परिणाम १९४७ साली दिसला. स्वातंत्र्य मिळाल्या नंतर सावरकरांनी सांगितले होते. आपल्या देशाच्या सीमा निश्चित व सुरक्षित करा. पण त्यावेळचे राजकर्ते स्वातंत्रतेच्या धुंदीत इतके मशगुल होते की त्यांनी सावरकरांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचा परिणाम आपण आता भोगतोय. १९६५ साली आपण पाकिस्तानवर विजय मिळवला,रशियाने आपले पंतप्रधान व पाकिस्तानचे अध्यक्ष यांना वाटाघाटी  साठी ताशकंदला बोलावले तेव्हा सावरकरांना वाटत होते शास्त्रीजिनी ताशकंदला जाऊ नये,कारण जे आपण लढून मिळवले आहे त्याच्यावर पाणी सोडण्यासाठी दडपण येईल अशी भीती वाटते. पण या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण जिंकलेला प्रदेश,व शास्त्रीजी यांना मुकलो.

— रवींद्र वाळिंबे

संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई ).

 

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..