( वीर सावरकर लेख मालिकेतील शेवटचा लेख )
सावरकरांचा जन्म १८८३चा तर सुभाषबाबूचा १८९७ चा दोघेही पराकोटीचे देशभक्त,दोघेही लंडनला गेले. सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी तर सुभाषबाबू आय सी एस ( हल्लीचे आय ए एस ) होण्यासाठी गेले. साल १९२१ मध्ये सावरकरांना भारतात आणले तर सुभाषबाबू आय सी एस चि नोकरी सोडून भारतात आले. सुभाषबाबू गांधीना भेटले पण स्वातंत्र्य मिळवण्याच्या मुद्द्यावर सुभाषबाबू व गांधीत तीव्र मतभेद झाले. गांधीचा मार्ग सत्याग्रहाचा तर सुभाषबाबू यांचा सशस्त्र क्रांतीवर होता. सावरकर १९२४ ते १९३७ पर्यन्त रत्नागिरीत स्थानबद्ध होते तर १९२५ व १९२६ मन्डाले येथील कारागृहात स्थानबद्ध होते. सावरकर १९३७ मध्ये हिंदुमहासभांचे अध्यक्ष झाले तर १९३८ सुभाषबाबू कॉँग्रेसचे अध्यक्ष झाले. पण देशाच्या दुर्दैवाने त्यांना अध्यक्षपद सोडावे लागले. दोघांनाही हिंदू संस्कृतीचा अभिमान होता. देश स्वतंत्र झाल्यावर राज्यकारभारचा आराखडा तयार केला होता दुर्दैवाने ते अमलात येऊ शकले नाही.१९३४मध्ये सुभाषबाबूनी “ हिंदुस्थानचा लढा “ पुस्तक लिहिले तर सावरकरांचे १८५७ चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक सुभाषबाबुना खूप आवडले होते. त्यांच्या आझाद हिंद सेनेत ते खूप लोकप्रिय झाले होते. १९३८ मध्ये सावरकर व सुभाषबाबू यांची गुप्त भेट झाली होती.
१९३९ मध्ये दुसरे महायुद्ध भडकले. इंग्लंड वरील आपत्ति हि आपली सुवर्णसंधी ही दोघांनाही मान्य होते. याच काळात उठाव व्हायला हवा असे दोघांनाही वाटत असे. स्वातंत्र्यप्राप्ती साठी शिवाजी महाराजांची नीती आंगिकारावी असे दोघांनाही वाटत होते. “ भारताबाहेर जाऊन ब्रिटिशांच्या शत्रूशी संधान बांधून स्वातंत्र्ययुद्ध करायला तुम्हीच सगळ्यात जास्त समर्थ आहात.” असे सावरकर सुभाषबांबुना म्हणत. पुढे विमान अपघातात सुभाषबाबू मृत्यू पावले तेव्हा सावकरांचा विश्वास बसेना .” संभाजी राजे गेले अशी आवई जशी शिवाजी महाराजानी आग्र्याच्या सुटकेच्या वेळी उठवली होती तसाच प्रकार असावा असे सावरकरांना बरेच काळ वाटे.
— रवींद्र वाळिंबे
संदर्भ व आभार-(शतपैलू सावरकर-लेखक हरिश्चंद्र त्र्यंबक देसाई )
Leave a Reply