बाई मी शेतात, शेतातं निंदते,
काळ्या मातीतं, जिवनं सांधीते…
हाती खुरपं, खुरप्यानं खुरपीते,
काळ्या मायंवर,नक्षी मी काढीते….!
बाई मी पिकाशी,पिकाशी बोलीते…
मव्हा संसार, संसार सांगते…
मन हालकं, फुलकं करीते…
सुख द:खाचा हिशोब मांडीते…!
बाई खुरपं गं, खुरपं संवंगडी…
त्याच्या साथीनं, किटाळ काढीते…
तणं शावकार, देनं मी मोडीते…
काळ्या मायचं रून मी फेडीते….!
बाई जगाचा जगाचा जलम….
जलम जलमे काळीच्या पोटात…
नाना परीचे,जिवं लहान थोरं…
काळ्या मायचा पसारा आचाट…!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply