बलाढ्य जरी हा सिंधू
कामास कुठे हो येतो
रेवा वाहे मंजुळवाणी
प्राशने मन प्रसन्न करितो
अर्थ–
विशालता ही प्रगतीची व्याख्या होऊ शकते, विशालता ही दिसण्यास जरी भव्य वाटली तरी त्याने आपल्याला खरंच काही मिळते का? विशाल सिंधु जरी आपल्या पोटात जमिनी खालचे जग चालवत असला तरी ते जग आजही आपल्याला अनभिज्ञ आहे. समुद्राचे पाणी आपल्याला तहान लागली तर पिता येते का? त्या पाण्यात बराच काळ शांतपणे आपल्याला डुंबता येत नाही. पण, रेवा जेव्हा वहाते तेव्हा ती जशी वाहील तशी आजूबाजूच्या परिसराची शुद्धता, प्रगती ही आपोआप होते. तिच्या मंजुळ प्रवाहात जशी शांतता मिळते तसेच सुख रेवाच्या उसळत्या पाण्यात देखील अनुभवायला मिळते.
म्हणून विशालता असणं म्हणजे प्रगती आहे असे मानणे प्रत्येकवेळी बरोबर असेलच असे नाही. तर कधी कधी लहान प्रवाहातून सुद्धा मोठे मोठे आनंदाचे प्रकल्प बांधता येतात.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply