कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात. या दिवशी प्रदोष काळात बळीराजाची पूजा करतात.
बळीराजाची प्रार्थना अशी –
‘बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो । भविष्येंन्द्रासुराराते पूजयं प्रतिगृह्यताम् । ।
विरोचन पुत्र, बलिराजा तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यातील इंद्र व असुरशत्रू आहेस. मी ही पूजा केलेली ग्रहण कर.
हा दिवस विक्रम संवताचा आरंभ दिन आहे. पूर्वी व्यापारी लोकांचे या दिवशी नूतन वर्ष सुरु होत असे. (हिशोबासाठी) काही व्यापारी पहाटे वहीपूजन करतात. स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात ते आजच. काही लोक दीपावली मधील प्रमुख दिवस आजचा मानतात.
याच दिवशी गोवर्धन पूजा, अन्नकुट करण्याची प्रथा आहे.
अशा या दीपावली उत्सवाचे स्वरूप काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत थोड्याफार फरकाने सारखेच दिसते सर्व सणामध्ये दीपावली उत्सव लोकप्रिय आहे. कारण पाऊस संपवून सुगीचे, समृद्धीचे दिवस सुरु झालेले असतात. म्हणून संपूर्ण समाज आनंदात असतो. आपल्या कष्टाच्या कमाईचा उपभोग घेण्याच्या इच्छेने दीपावलीचे हर्षाने स्वागत करतो.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply