तयांसवें करी काला दहींभात । शिदोऱ्या अनंत मेळवुनि ॥१॥
मेळवुनी अवघियांचे एके ठायी । मागे पुढे काही उरो नेदी ॥२॥
नेदी चोरी करू जाणे अंतरीचे । आपले ही साचे द्यावे तेथे॥३॥
द्यावा दही भात आपला प्रकार । तयाचा व्यवव्हार सांडवावा ॥४॥
वाटी सकळांसि हाते आपुलिया । जैसे मागे तया तैसे द्यावे ॥५॥
द्यावे सांभाळुनी समतुकभावे । आपण हि खावे त्यांचे तुकें ॥६॥
तुक सकळांचे गोविंदाचे हाती । कोण कोणे गति भला बुरा ॥७॥
राखे त्यासि तैसे आपलाल्या भावे । विचारुनि द्यावे जैसे तैसे ॥८॥
तैसे सुख नाही वैकुंठीच्या लोका । ते दिले भाविका गोपाळांसि ॥९॥
गोपाळांचे मुखी देउनी कवळ । घास माखे लाळ खायत्याची ॥१०॥
त्यांचिये मुखी चे काढूनिया घास। झोंबता हातास खाय बळे ॥११॥
बळे जयाचिया ठेंगणे सकळ । तयाते गोपाळ पाडितील ॥१२॥
पाठी उचलूनि वाहातील खांदी । नाचतील मांदी मेळवुनी ॥१३॥
मांदी मेळवुनी धणी दिली आम्हा । तुका म्हणे जमा केल्या गाई ॥१४॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply