संयोग सकळां असे सर्वकाळ । दुश्चित्त गोपाळ आला दिसे ॥१॥
गोपाळ गुणाचा म्हणे गुणमय । निंबलोण माये उतरिले ॥२॥
उतरूनि हाते धरि हनुवटी । ओवाळूनि दिठी सांडियेली॥३॥
दिठी घाली माता विश्वाच्या जनका । भक्तिचिया सुखा गोडावला ॥४॥
लहान हा थोर जीवजंत भूते । आपण दैवते झाला देवी ॥५॥
देवी म्हैसासुर मुंजिया खेचर । लहान हि थोर देव हरि ॥६॥
हरि तुका म्हणे अवघा एकला । परि या धाकुला भक्तीसाठी ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply