नाहीं त्याची शंका वैकुंठनायका । नेणती ते एकाविण दुजा ॥१॥
जाणतियां सवे येऊ नेदी हरि । तर्कवादी दुरी दुराविले॥२॥
वादियासि भेद निंदा अहंकार । देऊनिया दूर दुराविले ॥३॥
दुरावले दूर आशाबध्द देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥४॥
चित्ती द्रव्यदारा पुत्रादिसंपत्ती । समान ते होती पशु नर ॥५॥
नरक साधिला विसरोनि देवा । बुडाले ते भवनदीमाजी ॥६॥
जिही हरिसंग केला संवसारी । तुका म्हणे खरी खेप त्यांची ॥७॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply