नेदी कळो केल्याविण तें कारण । दाखवी आणून अनुभवा ||१||
न पुरेसा हात घाली चेंडूकडे । म्हणितले गडे सांभाळावें ||२||
सांभाळ करिता सकळा जीवांचा । गोपाळांसी वाचा म्हणे बरे ||३||
बरे विचारुनि करावे कारण । म्हणे नारायण ब-या बरे ||४||
बरे म्हणुनियां तयाकडे पाहे । सांडविला जाय चेंडू तळा ||५||
तयासवे उडी घातली अनंते । गोपाळ रडत येती घरा ||६||
येतां त्यांचा लोकीं देखिला कोल्हाळ । सामोरी सकळ आलि पुढे ||७||
पुसती ते मात तया गोपाळांसी । हरिदुःखे त्यांसी न बोलवे ||८||
न बोलवे हरि बुडलासे मुखेँ । कुटितील दुःखे ऊर माथे ||९||
मायबापे तुका म्हणे न देखती । तैसे दुःख चित्तीं गोपाळांच्या ||१०||
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||
Leave a Reply