जगामध्ये असंख्य ठिकाणी असलेल्या खाणींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काम चालू असते. अनेकदा या कामाची व्याप्ती वाढविण्यासाठी खाणीत अनेकदा अत्याधुनिक व भयानक शस्त्रास्त्रांद्वारे वा स्कोटकाद्वारे स्फोट घडवून आणले जातात.
हे स्फोट इतके भयानक असतात की दरवर्षी या स्फोटात किमान २५ हजार जणांचा तरी मृत्यू होतो. खाणीतील अशा स्फोटक प्रकारांना बंदी घालण्यात यावी म्हणून एका महिलेने आंतराष्ट्रीय चळवळ उभारली व ती नावारुपासही आणली. या चळवळीबद्दलच तिला १९९७ सालचे शांतीविषयक नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आले. जोडी विल्यम्स हे त्या महिलेचे नाव.
मूळची अमेरिकेची असलेली जोडी विल्यम्स हिने जेव्हा खाण कामगारांच्या समस्यांचा अभ्यास सुरू केला तेव्हा तिला खाणीमध्ये केल्या जाणाऱ्या भयानक स्फोटांचे दुष्परिणाम जाणवले. या स्फोटांमध्ये दरवर्षी जगात हजारो बळी जात असूनही प्रमुख राष्ट्रांचे त्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून जोडी विल्यम्सने ‘बॅन लॅण्डमाइन्स’ याच नावाने चळवळ सुरू केली.
या चळवळीला थोड्याच दिवसात इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की, युवराज्ञी डायना देखील त्या चळवळीकडे आकृष्ट झाली. अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आदी प्रमुख राष्ट्रांनी खाणीतील स्फोटांवर बंदी घालावी, अशी मागणी जोडी विल्यम्सने या चळवळीद्वारे केली होती. मात्र प्रारंभी, ही राष्ट्रे तयार झाली नाहीत. त्यामुळे या चळवळीला आणखी धार आली.
डायनाच्या मृत्यूनंतर ही चळवळ व्यापक होत गेली. जनतेचा जसजसा पाठिंबा मिळत गेला तसतशी काही राष्ट्रे या स्फोटांवर बंदी घालण्याचा विचार करू लागली. रशियानेदेखील या बंदीसंबंधीच्या करारावर सही करण्याची तयारी दर्शवली. रशियाच्या या निर्णयाचे कॅनडाने स्वागत केले. जगातील एकूण नव्वद राष्ट्रांनी या बंदी करारावर आतापर्यंत स्वाक्षऱ्या केल्या आहेत. त्याला जोडी विल्यम्सची चळवळ कारणीभूत होती. म्हणूनच या शांतीकार्यासाठी तिला नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
Leave a Reply