प्रत्यक्ष गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत केळे सर्व लोकांना आवडते. केळ्याची उत्पत्ती कशी झाली हे सांगणे कठीण. साधारणपणे १६व्या शतकात पोर्तुगीजांनी भारतात पहिल्या प्रथम केळ्याची लागवड केली. मात्र केळीचा प्रसार ब्राझील, आफ्रिकन देश वगैरे देशात मोठ्या प्रमाणात झाला. केळ्याला इथर प्लँटेन असे म्हणत असत. भारतात याचे विविध प्रकार आढळतात. वसईची प्रसिद्ध केळी, वेलची केळी, राजाळी केळी वगैरे अनेक प्रकारची केळी मिळतात. दक्षिणेकडे लाल, पिवळी वगैरे अनेक प्रकारची केळी मिळतात. साधारणपणे प्रत्येकाने १ कप दूध व एक हिरव्या सालीचे केळे याला पूरक अन्न असे म्हणतात. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिज द्रव्ये, पोटॅशियम, लोह, चुना, मँगेनिज, मॅग्नेशियम वगैरे अनेक पौष्टिक पदार्थ आढळतात.
केळ्याचे विविध प्रकार करता येतात. केळ्याचे वेफर केरळात प्रसिद्ध आहेत.
तसेच आज केळ्याची पावडर (पूड) म्हणूनही बाजारात मिळते. केळ्याच्या फुलांना केळफुल असे म्हणतात. केळ्याची भाजीही उत्तम प्रकारे करता येतात. तसेच केळ्याची हिरवी पाने केरळात जेवणाकरिता वापरण्याची प्रथा आहे. केळ्याचे आज निर्यातही फार मोठ्या प्रमाणात होते. भारतामध्ये आजतागायत टिश्यू कल्चर करून केळ्याची लागवड मोठ्या प्रमाणात करतात. केळीचे खांब ह देखील धार्मिक कामांसाठी वापरतात. असे हा अत्यंत गुणी व गरीब ते श्रीमंतापर्यंत सर्वचजण केळी या फळाचा वापर करतात.
– मदन देशपांडे
Leave a Reply